आर्थिक वर्ष २०१९-२० च्या चौथ्या तिमाहित रिलायन्स जिओला मोठा नफा झाल्याची माहिती समोर आली आहे. वार्षिक आधारावर हा नफा वाढून १७७.५ तर तिमाही आधारावर हा नफा ७२.७ टक्क्यांनी वाढून २ हजार ३३१ कोटी रूपये इतका झाला आहे. याव्यतिरिक्त जिओचा सबस्क्रायबर बेसही २६.३ टक्क्यांनी वाढून ३८.७५ कोटीवर पोहोचला आहे. तर जिओचा एआरपीयू (ARPU) वाढून १३०.६० रूपये झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिओचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू वार्षिक आधारावर २६.६ तर तिमाही आधारावर ६.२ टक्क्यांनी वाढून १४ हजार ८३५ कोटी रूपये झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत जिओचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू ११ हजार ७१५ कोटी रूपये तर डिसेंबर तिमाहित तो १३ हजार ९६८ कोटी रुपये इतका होता. तर वार्षिक आधारावर EBITDA ४३.२ टक्के आणि तिमाही आधारावर १०.७ टक्क्यांनी वाढून ६ हजार २०१ कोटी रुपये झाला आहे. तर EBITDA मार्जिनही वार्षिक आधारावर वाढून ४१.८ टक्के राहिली आहे. तर वार्षिक आधारावर EBIT ५६ टक्क्यांनी वाढून ४ हजार ३३ कोटी रुपये राहिली आहे.

फेसबुक डिलनं जिओची व्हॅल्यू वाढली

नुकतीच फेसबुकनं रिलायन्स जिओसोबत भागीदारी केल्याची घोषणा केली होती. फेसबुक रिलायन्स जिओमधील ९.९९ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. यासाठी फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीनंतर जिओची एन्टरप्राईझ व्हॅल्यू ४.६२ लाख कोटी इतकी झाली आहे.

RIL च्या नफ्यात घट

आर्थिक वर्ष २०२० च्या चौथ्या तिमाहित रिलायन्स इंडस्ट्रिजवर लॉकडाउनचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. चौथ्या तिमाहित वार्षिक आधारावर रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडच्या नफ्यात ३९ टक्क्यांची घट होऊन तो ६ हजार ३४८ कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा नफा १० हजार ३६२ कोटी रूपये होता. तर २०२० च्या तिसऱ्या तिमाहित कंपनीचा नफा रेकॉर्ड ११ हजार ६४० कोटी इतका होता.

डिजिटल सर्व्हिसेससाठी संधी

“फेसबुकसोबत हातमिळवणी नंतर कंपनीची एन्टरप्राईझ व्हॅल्यू वाढली आहे. केवळ ३.५ वर्षात ती रिलायन्स जिओशी स्पर्धा असलेल्या एअरटेल पेक्षा अधिक झाली. फेसबुकसोबतच्या डिलनंतर रिलायन्ससाठी डिजिटल सर्व्हिसेसच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसंच कंपनीच्या रिटेल, डि़जिटल आणि इंटनेस व्यवसायातही वाढ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या बॅलन्सशीटवरही त्याचा चांगला परिणाम दिसून येईल,” असं मत ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाच्या प्रमुखांनी व्यक्त केलं.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio mukesh ambani profit increased by 177 percent to 2331 crore rupees on yearlr basis jud