भारतीय भांडवली बाजाराचा जगभरात वाढत्या दबदब्याचा प्रत्यय म्हणजे निफ्टी निर्देशांकावर आधारित एक्स्चेंज ट्रेडेड फंडाचे (ईटीएफ) व्यवहार आता तैवान शेअर बाजारात सुरू झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे या बाजारात व्यवहार होत असलेली ही पहिलीच भारतीय ईटीएफ योजना आहे.
तैवानस्थित फ्युबन अॅसेट मॅनेजमेंट कंपनीद्वारे तीन ईटीएफ – फ्युबन निफ्टी ईटीएफ, फ्युबन निफ्टी २ एक्स लीव्हरेज्ड इंडेक्स ईटीएफ आणि फ्युबन निफ्टी-१ इन्व्हर्स इंडेक्स ईटीएफ अशा तीन योजना तेथे सुरू केल्या आहेत. या तीन निर्देशांकांची रचना एनएसईची उपकंपनी इंडिया इंडेक्स सव्र्हिसेस अँड प्रॉडक्ट्स लि. या कंपनीनेच केली आहे. या ईटीएफ योजनांतून तेथील गुंतवणूकदारांना आता अल्प खर्चात भारतीय बाजाराच्या प्रगतीचा वेध घेणारी गुंतवणूक करता येईल. तैवानमधील सूचिबद्धतेसह आता निफ्टी निर्देशांकांवर आधारित ईटीएफमध्ये गुंतवणुकीची संधी विविध १९ जागतिक बाजारांत उपलब्ध झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Mar 2016 रोजी प्रकाशित
‘निफ्टी ईटीएफ’चे व्यवहार तैवानच्या बाजारात खुले
उल्लेखनीय म्हणजे या बाजारात व्यवहार होत असलेली ही पहिलीच भारतीय ईटीएफ योजना आहे.
Written by लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 31-03-2016 at 03:54 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taiwan stock exchange nifty