1st May 2024 Marathi Horoscope: मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी आज गुरु ग्रहाचे वृषभ राशीत गोचर होऊन महिन्याची सुरुवात होणार आहे. आज चैत्र कृष्ण सप्तमी, अष्टमी तिथी एकत्र असणार आहे. आजच्या दिवशी श्रवण नक्षत्र जागृत असणार असून अनेक शुभ योग असतील. आज अभिजात मुहूर्त नसला तरी दिवस शुभ असेल. दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपासून ते १ वाजून ५७ मिनिटांपर्यंत राहू काळ असल्याने शुभ कार्य टाळावीत. चंद्र आज मकर राशीत विराजमान असणार आहे. आजचे दिनविशेष पाहायचे झाल्यास, महाराष्ट्र दिन, गुजरात दिन व कामगार दिन साजरा केला जाणार आहे. आजच्या दिवशी राशीनुरुप तुम्हाला कसे फळ मिळेल याचा हा आढावा पाहूया ..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१ मे २०२४ पंचांग व राशी भविष्य

मेष:-आत्मविश्वास वाढीस लागेल. ठामपणे विचार नोंदवाल. मैत्रीतील दुरावा वाढू देवू नये. नवीन संधीकडे लक्ष द्यावे. सढळ हाताने मदत कराल.

वृषभ:-गप्पा गोष्टींमधून विनोद निर्मिती कराल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. कलेला पोषक वातावरण लाभेल. अचानक धनलाभ संभवतो. उत्तम विचार मांडाल.

मिथुन:-काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका. जोडीदाराविषयी गैरसमज नकोत. कामातील क्षुल्लक चुका दुरूस्त करा. वरिष्ठांची मर्जी राखावी.

कर्क:-नवीन मैत्रीचे संबंध जुळून येतील. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. कामाच्या ठिकाणी हयगय करू नका. क्षुल्लक गोष्टींमुळे मनस्ताप संभवतो. जोडीदाराच्या वागण्याचा शांतपणे विचार करावा.

सिंह:-रेस जुगारापासून दूर राहावे. वादाचे मुद्दे टाळण्याचा प्रयत्न करावा. आलेली संधी सोडू नका. मुलांच्या समस्या समजून घ्याव्यात. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

कन्या:-घरगुती समस्या दूर कराव्यात. विरोधाला बळी पडू नका. चांगल्या संगतीत रमून जाल. नवे अनुभव गाठीशी बांधाल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद लाभेल.

तूळ:-मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. भागीदारीतील लाभाकडे काटेकोरपणे लक्ष द्या. कष्ट करण्यास मागे पुढे पाहू नका.

वृश्चिक:-नातेवाईकांचा विरोध वाढू शकतो. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. खाण्या पिण्याची पथ्ये पाळावीत. उष्णतेचे विकार बळावू शकतात कौटुंबिक बाबींमध्ये विशेष लक्ष घालावे.

धनू:-स्वभावातील हट्टीपणा कमी करण्याचा प्रयत्न करावा. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. कामे मनाजोगी पार पडतील. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. जुन्या कामात गुंतून पडाल.

मकर:-मानसिक स्थैर्य जपावे. सामाजिक गोष्टींचे भान राखावे. फसवणुकीपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना सतर्क राहा. बोलताना सारासार विचार करावा.

कुंभ:-किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. अहंभावनेने कामे करू नयेत. स्वत:च्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. आततायी वागणे टाळावे. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा.

हे ही वाचा<< ३१ मेपर्यंत ‘या’ राशींना मिळेल सुखाचा गारवा; पहिल्या दिवसापासून कुंडलीत मोठे बदल, लाभ कुणाला? १२ राशींचे भविष्य वाचा

मीन:-काही खर्च अचानक सामोरी येतील. घरातील कामासाठी वेळ काढाल. व्यावसायिक गोष्टींचे भान राखावे. हातातील कलेसाठी वेळ काढावा. मनातील वैर भावना काढून टाकावी.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1st may panchang guru gochar in vrushbh mesh to meen rashi kundali will see changes daily marathi horoscope money astrology today svs