Chaturgrahi Yog in Taurus: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो. म्हणजे तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्यांच्या वेळेनुसार आपल्या राशीमध्ये बदल करतात. बुध ग्रह व्यवसाय, बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, गणित यांचा कारक मानला जातो. ज्यावेळी बुध ग्रहाच्या चालीत बदल होतो तेव्हा त्याचा या क्षेत्रांवर फरक पडताना दिसतो. आता बुध ग्रह गोचर करणार आहे. उद्या शुक्रवारी, ३१ मे ला बुधदेव वृषभ राशीत गोचर करणार आहे. जिथे आधीपासून सूर्य, शुक्र आणि गुरु स्थित आहेत. त्यामुळे ‘चतुर्ग्रही योग’ निर्माण होणार आहे. हा योग काही राशींसाठी फार शुभ ठरणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींच्या धन-संपत्तीत होणार प्रचंड वाढ?

कन्या राशी

चतुर्ग्रही योग बनल्याने कन्या राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होऊ शकतात. या राशींच्या लोकांना नोकरी, करिअरमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. नोकरीच्या शोधात जे आहेत त्यांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. रखडलेली सगळी कामं पूर्ण होऊ शकतात. धनलाभाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला या काळात चांगला नफा मिळू शकतो. परदेशी जाण्याचं तुमचं स्वप्न देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. लग्नाच्या संदर्भात चांगली बातमी मिळू शकते. 

(हे ही वाचा : तब्बल ३०० वर्षानंतर जुळून येतोय ‘महा दुर्लभ संयोग’; ६ दिवसांनी ‘या’ राशींची लागणार लाॅटरी? जीवनात असेल राजयोग!)

वृश्चिक राशी

चतुर्ग्रही योग बनल्याने वृश्चिक राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. अनेक दिवसांपासून एखाद्या ठिकाणी अडकून असलेले पैसे याकाळात परत मिळू शकतात. याकाळात या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. नोकरदारांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते. जर तुम्ही हॉटेल, पर्यटन आणि सोने-चांदीशी संबंधित व्यवसाय करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. या दरम्यान धार्मिक यात्रेला जाण्याचा देखील योग बनतोय. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल व जोडीदारासोबतचे सर्व वाद मिटू शकतात. संतान प्राप्तीचा देखील चांगला योग आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही हा काळ चांगला राहू शकतो.

कुंभ राशी

चतुर्ग्रही योग बनल्याने कुंभ राशीच्या लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय लाभदायी ठरु शकतो. गुंतवणुकीतून नफा मिळण्याचीही शक्यता आहे. यावेळी सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांना नोकऱ्या मिळू शकतात. तसेच राजकारणाशी संबंधित असाल तर निवडणूक जिंकू शकता. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तसेच, यावेळी तुम्ही एखादी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. घरातील वातावरण आनंदी असण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)