Horoscope Today 02 October 2022 Daily Astrology Rashi Bhavishya In Marathi msr 87 | Loksatta

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, रविवार ०२ ऑक्टोबर २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार तूळ राशीच्या व्यक्तींनी निर्णयाचा पुनर्विचार करावा. जुनी देणी फेडाल.

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, रविवार ०२ ऑक्टोबर २०२२
आजचे राशीभविष्य १४ ऑक्टोबर , (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 02 October 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

अतिघाईत निर्णय घेऊ नका. मनावर ताबा ठेवा. जटिल समस्येवर तोडगा निघू शकेल. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

हातातील काम पूर्ण होईल. आज अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. जवळचा प्रवास सुखाचा होईल. प्रेमातील व्यक्तीसाठी नातेसंबंध दृढ करणारा दिवस.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

दिवसभर कामाची लगबग राहील. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. दुसर्‍यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सहकार्‍यांना कमी लेखू नका. टीमवर्कचे महत्त्व लक्षात घ्यावे.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

धावपळीचा दिवस राहील. आपल्याच नादात दिवस घालवाल. स्वत:च्याच मताला चिकटून राहाल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मित्राची गाठ पडेल.

सिंह (Leo Horoscope Today ):-

सरकारी कामे पुढे सरकतील. प्रकृतीस जपावे. वादविवादात आपली सरशी होईल. व्यावसायिक क्षेत्रात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. फार काळजी करू नये.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

स्वत:वर कायम विश्वास ठेवावा. विजय तुमचाच होईल. आपली जबाबदारी ओळखून काम कराल. तुमची प्रतिमा उंचावेल. अधिकची कामे अंगावर पडतील.

तूळ (Libra Horoscope Today ):-

निर्णयाचा पुनर्विचार करावा. जुनी देणी फेडाल. घरात शांतता ठेवावी. अनावश्यक खर्चाला कात्री लावावी. दिनचर्येत थोडासा बदल करून पाहावा.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

नोकरी व्यवसायात नवीन काम मिळेल. उत्साहात दिवस जाईल. दिवसाची सुरुवात संपर्क साधण्यात जाईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. खोट्या गोष्टींचा आधार घ्याल.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

दिवस कामात व्यस्त राहील. खर्चिक कामे निघतील. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नवीन ओळख वाढवताना सावध रहा. कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. हलगर्जीपणा करून चालणार नाही. दिवस उत्साही असेल. आनंदी मनाने कार्यरत राहाल. प्रलोभनाला भुलू नका.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

रखडलेली कामे हळूहळू पुढे सरकतील. व्यायामात खंड पडू देऊ नका. मुलांची चिंता सतावेल. जि‍भेवर ताबा ठेवावा. आव्हानांचा सामना करावा.

मीन (Pisces Horoscope Today ):-

नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. आततायीपणे कामे करू नका. आत्ममग्न राहाल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Numerology October 2022: ऑक्टोबरचा दिवाळी धमाका! तुमची जन्मतारीख व नावाचं पहिलं अक्षर काय सांगतं पाहा

संबंधित बातम्या

२९ डिसेंबर पर्यंत ‘या’ तीन राशींवर लक्ष्मी करणार धनवर्षाव? सूर्य व शुक्राची युती देऊ शकते अपार श्रीमंती
‘या’ गुणांवरून ओळखले जाते श्रेष्ठ व्यक्तीमत्त्व; यशस्वी होण्यासाठीही ठरतात फायदेशीर
३१ डिसेंबरपासून ‘या’ ५ राशींचे सुरू होतील वाईट दिवस? तुमच्याही राशीचा समावेश आहे का यात?
वर्ष २०२२ च्या शेवटच्या महिन्यात ‘या’ ४ राशींच्या आयुष्यात होतील मोठे बदल; मिळेल नशिबाची भक्कम साथ
५ डिसेंबरपासून ‘या’ राशींच्या भाग्यात चमकणार ‘शुक्रा’चे चांदणे? नववर्षात अपार धनलाभाची संधी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
हुरड्यापूर्वीच ज्वारीच्या कणसांचा पक्ष्यांकडून फडशा; शेतकरी चिंताग्रस्त, हुरडा पार्ट्यांवर परिणामाची शक्यता
अन् लग्नाच्या विधीदरम्यान नवरदेवानं केलं ऑफिसचं काम! फोटो व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, “वर्क फ्रॉम होम…”
IND vs NZ 2nd ODI: सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी, पाहा
“सतत एकेरी उल्लेख करतोय कारण…” विक्रम गोखलेंच्या निधनानंतर शरद पोंक्षे यांचं ट्वीट चर्चेत
क्रिती सेनॉन होणार प्रभासची बायको? त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत म्हणाली…