Saturn Direct 2023: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करत असतात. ग्रह वक्री होणे व मार्गी होणे हा सुद्धा याच गोचर कक्षेतील क्रम असतो. जेव्हा ग्रह नियमित कक्षेच्या उलट दिशेने प्रवास करतात तेव्हा त्याला वक्री होणे म्हणतात व जेव्हा सरळ दिशेने ग्रह प्रवास करतात त्याला मार्गी होणे म्हणतात. शनीदेव हे ग्रहमालेतील न्याय व कर्म देवता मानले जातात. त्यामुळे शनीच्या राशी बदलालाच नव्हे तर काही अंशी झालेल्या स्थितीबदलाला सुद्धा तितकेच महत्त्व आहे. शनीची गती संथ असते त्यामुळे त्यांच्या राशी बदलास साधारण अडीच वर्षांचा वेळ लागतो. या वर्षाच्या सुरुवातीला शनिदेव राशीबदल करू कुंभ राशीत विराजमान झाले आहेत. आणि ४ नोव्हेंबरला शनी मार्गी होणार आहेत. या मार्गी होण्याच्या प्रक्रियेत शनीचा सर्वात महत्त्वाचा असा शश महापुरुष राजयोग तयार होत आहे. यामुळे तीन राशींच्या नशिबात सुवर्णकाळ सुरु होणार आहे. या तीन राशी कोणत्या हे पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शश महापुरुष राजयोगाने ‘या’ तीन राशींचा सुवर्णकाळ होईल सुरु?

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

कुंभ ही शनीची स्वामित्वाची रास आहे. शनी मार्गी झाल्याने कुंभ राशींचे भाग्य उजळून निघणार आहे. कुंभ राशीला स्वामी अत्यंत आत्मविश्वासू बनवतील ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तसेच खाजगी आयुष्यात सुद्धा तुम्हाला मान- सन्मान मिळू शकतो. तुम्हाला भागीदारीच्या कामांमधून खूप आर्थिक लाभ होऊ शकतो. उच्च पदावरील वरिष्ठांसह चांगले संपर्क होतील त्यामुळे तुम्हाला येत्या काळात आपल्या वाणीमुळे अनेक कामे मार्गी लागताना दिसून येतील. तुम्हाला जोडीदाराचे मन सांभाळण्यासाठी मेहनत घ्यावी लागू शकते.

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ राशीसाठी शनी मार्गी होणे ही नशिबाचे टाळे उघडण्याची सुरुवात असणार आहे. शश महापुरुष राजयोग तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतो. कामाच्या ठिकाणी मोठा बदल होऊ शकतो ज्यामुळे तुम्ही विचार न केलेले यश तुमच्या वाट्याला येऊ शकतो. तुमचे आर्थिक बळ वाढू शकतो. तुम्हाला काही प्रमाणात स्पर्धेला तोंड द्यावे लागू शकते पण यामुळे तुमच्या प्रगतीच्या कक्षा रुंदावणार आहेत. विवाहासाठी इच्छुक असणाऱ्यांना शनीसह लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद लाभू शकतो.

हे ही वाचा<< ६ दिवसांनी ‘महागोचर’! शेवटच्या श्रावणी सोमवारनंतर ‘या’ राशींना लाभेल शिवपार्वतीची कृपा, होऊ शकता श्रीमंत

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

सप्टेंबर महिन्यात होणारे सूर्य गोचर सिंह राशीला अगोदरच प्रगतीपथावर आणणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये शनी मार्गी झाल्याने या प्रगतीचा वेग वाढणार आहे.वैवाहिक आयुष्य सुधारणार आहे. पती- पत्नीच्या नात्याला मजबूत करू शकेल अशी एखादी घटना घडू शकते. भौतुक सुखाची म्हणजेच घर, प्रॉपर्टी, वाहन, सोने अशा खरेदीची संधी आहे. आर्थिक फायद्यांमुळे मन शांत होईल. प्रामाणिकपणाला डाग लागू देऊ नका.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani margi makes shash mahapurush rajyog these three rashi golden period to start lakshmi bring more money happiness svs