Shravan 2024 Horoscope: हिंदू पंचागानुसार, मराठी महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात काही ना काही सण-उत्सव साजरे केले जातात. हिंदू धर्मात सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र महिना हा श्रावण मानला जातो. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावणात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा मोठ्या श्रद्धेने केली जाते. यंदा २२ जुलैपासून श्रावण सुरू होत असून तो खूप खास मानला जात आहे. श्रावण २२ जुलै ते १९ ऑगस्ट २०२४ पर्यंत राहील. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवाची आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा करण्याची प्रथा आहे. असे केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. यंदाच्या श्रावणाला ग्रह नक्षत्रांची स्थिती पाहता ७२ वर्षांनी एक अद्भूत संयोग घडून येत आहे. यावेळी आयुष्यमान आणि सिध्दी योग निर्माण होत आहे. त्यामुळे यंदाच्या श्रावणात काही राशींना शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींचे भाग्य चमकणार?
मेष राशी
श्रावण मेष राशीतील मंडळीसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कार्यक्षेत्रात मोठं यश प्राप्त होण्याची शक्यता असून वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकतो. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून या कालावधीत तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. श्रावणात शंकराची कृपा दुप्पटीने लाभू शकते. रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. तसेच नोकरीच्या नव्या संधीही याकाळात उपलब्ध होऊ शकतात.
(हे ही वाचा: वाईट काळ संपणार! ऑगस्टपासून बुधलक्ष्मी कृपेने ‘या’ राशींचे सुखाचे दिवस येणार? मिळू शकतो बक्कळ पैसा)
सिंह राशी
सिंह राशीसाठी श्रावण महिना चांगला ठरू शकतो. कार्यक्षेत्रात उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांवर भोलेनाथाची विशेष कृपा असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. मान-सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे. राजकारणाशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. तुम्ही कोणतेही पद देखील मिळवू शकता.
धनु राशी
श्रावण महिना धनु राशीतील मंडळीसाठी प्रचंड धनलाभ घेऊन येणारा ठरु शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. तसेच नवीन व्यवसाय सुरू करणेही फायदेशीर ठरू शकते. या वेळी गुंतवणूक केली तर या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांना शंकराच्या कृपने सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. याशिवाय या लोकांना व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते. प्रेम संबंधामध्ये सुख समृद्धी नांदू शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)
© IE Online Media Services (P) Ltd