ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी वक्री आणि मार्गी स्थितीत फिरतात, ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि देशासह जगावर होतो. अशातच आता धन आणि वैभवाचा दाता शुक्र २३ जुलै रोजी सिंह राशीत वक्री होणार आहे. शिवाय तो ७ ऑगस्टला कर्क राशीत गोचर करणार आहे. तिथेही तो वक्री अवस्थेत राहणार आहे. अशा स्थितीत शुक्र ग्रह ४३ दिवस वक्री अवस्थेत गोचर करेल. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. परंतु ४ अशा राशी आहेत, ज्यांना या काळात धनलाभ होण्यासह नशिबाची साथ मिळू शकते, तर त्या ४ भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus Zodiac)
शुक्राची वक्री चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. यासोबतच नोकरी-व्यवसायतही चांगली प्रगती होऊ शकते. तसचे शनिदेवही वक्री असल्यामुळे यावेळी तुम्ही वाहने आणि मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच आईचे आरोग्य चांगले राहू शकते. सुख आणि साधनात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
मिथुन रास (Mithun Zodiac)
शुक्राची वक्री चाल मिथुन राशीसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच, जर तुम्ही फिल्म लाइन, मीडिया, मॉडेलिंग किंवा कलेशी निगडीत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरु शकतो. तसेच, यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते.
कर्क रास (Cancer Zodiac)
शुक्राचे वक्री होणे कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या शुभ ठरू शकते. कारण शुक्र तुमच्या राशीत वक्री होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. त्याचबरोबर आदरही मिळू शकतो. तसेच सासरी काही कार्यक्रम होऊ शकतो. यावेळी तुमचे आरोग्यही चांगले राहू शकते. तर नोकरी-व्यवसायात झपाट्याने प्रगती होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- शुक्र चंद्र युतीचा ‘कलात्मक योग’ बनताच ‘या’ राशींच्या संपत्तीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता
तूळ रास (Tula Zodiac)
शुक्राची वक्री चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या उत्पन्नाच्या स्थानी वक्री होणार आहे. म्हणूनच यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. यासोबतच उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. दुसरीकडे, जे विवाहित आहेत, त्यांचे वैवाहिक जीवन चांगले राहू शकते. नोकरदारांचे प्रमोशन होऊ शकते.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)