औरंगाबाद :  ‘काय अद्भूत ऐतिहासिक स्थळ आहे आणि ते मला आणि जगाला दाखविल्याबद्दल धन्यवाद’ या शब्दात अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी वेरुळ लेणी पाहिल्यानंतर आपल्या भावना भारतीय पुरातत्त्व विभागाच्या शेरा पुस्तिकेत बुधवारी नोंदवल्या. त्यांनी सकाळी १०.३० ते १ वाजेपर्यंत वेरुळ लेणीमधील  ‘कैलास’ ही १६ क्रमांकाची लेणी, तसेच १०, ३२ आणि ३४ क्रमांकाच्या बौद्ध, जैन लेणींचे शिल्पसौंदर्य अनुभवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेरुळ लेणीमधील कैलास लेणीसह इतर सर्व लेणींची माहिती त्यांना भारतीय पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितली.  अहमदाबादहून हिलरी क्लिंटन खासगी विमानाने औरंगाबाद येथे आल्यानंतर त्यांनी खुलताबाद येथील शहाजतपूर येथील ध्यान फार्मस् येथे मुक्काम केला.  वेरुळ लेणीमधील सर्वप्रकारची शिल्पे त्यांना दाखविण्यात आली. या लेणीमध्ये एका पाषाणात संपूर्ण रामायण कोरलेले आहे.

देशातील पर्यटनाला चालना मिळते आहे. पूर्वी युरोपात फिरायला जाणे हे स्वप्न असे. आता युरोपातील महत्त्वाची नेते मंडळी भारत पाहायला येऊ लागली आहेत. त्याचा अभिमान आहे आणि जबाबदारी वाढत असल्याचे भानही वाढते आहे. जगात भारत पुढे जायला हवा, या उद्देशाने काम सुरूच आहे. क्लिंटन यांच्या भेटीमुळे युरोपीय देशांमधील पर्यटक वाढायला मदत होईल.  

–  मंगलप्रभात लोढा, पर्यटन मंत्री

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hillary clinton was overwhelmed by the verul caves commenting wonderful historical site ysh