03 August 2020

News Flash

Admin

शहरात पारंपरिक पद्धतीनेच गणेशोत्सव

सार्वजनिक उत्सवाच्या साजरीकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने काही निर्बंध घालण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी शहरात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच याबाबतचे धोरण आखण्याची मागणी महानगरपालिकेच्या सभेत करण्यात आली.

पुण्यात आंतरराष्ट्रीय नेमबाजांची मांदियाळी

अंजली भागवत, समरेश जंग, राही सरनोबत, पूजा घाटकर, आयोनिका पॉल आदी आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह चार हजारहून अधिक खेळाडू गन फॉर ग्लोरी अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा : मनोजचा उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश

राष्ट्रकुल स्पध्रेतील माजी सुवर्णपदक विजेता मनोज कुमारने आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पध्रेत ६४ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

कलबुर्गी हत्येचा तपास सीबीआयकडे ; हत्येची जबाबदारी घेणाऱ्यास अटक

पुरोगामी कन्नड विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय कर्नाटकच्या मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी घेण्यात आला.

दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करा अमेरिकेची पाकिस्तानला समज

पाकिस्तानच्या हद्दीत असलेली दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करण्याचे प्रयत्न वाढवावेत, तसेच अफगाणिस्तानमधील अमेरिकन प्रतिष्ठापनांवरील मोठय़ा हल्ल्यांसाठी जबाबदार …

जागावाटपावरून सहकारी पक्षांचा भाजपवर दबाव?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकवटलेल्या जनता परिवारात खडाखडी न होता जागावाटप झाले असताना भाजपला मात्र सहकारी पक्षांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागत आहेत.

न्यूझीलंडमध्ये ज्वालामुखी क्षेत्रात सोन्याचा मोठा साठा

न्यूझीलंडमधील टॉपो ज्वालामुखी क्षेत्राच्या भूमिगत खोऱ्यात कोटय़वधी डॉलर्सचे सोन व चांदी सापडण्याची शक्यता आहे असे भूगर्भशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्याची विधी आयोगाची बहुमताने शिफारस

दहशतवादाशी संबंधित गुन्हे आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारणे ही प्रकरणे वगळता इतर सर्व प्रकरणांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा रद्द केली जावी, अशी शिफारस विधि आयोगाने बहुमताने केली आहे.

‘भूसंपादना’वर केंद्रीय मंत्र्यांची सारवासारव!

भूसंपादन कायद्यासाठी सलग चौथ्यांदा अध्यादेश काढणार नसल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर आता भाजपचे तमाम नेते व केंद्रीय मंत्री सरकारची सारवासारव करण्यात गुंतले आहेत.

पाहाः ‘आशिकी’मधील ‘धीरे-धीरे’ गाण्यावर हृतिक-सोनमचा रोमान्स

राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या ‘आशिकी’ चित्रपटातील ‘धीरे धीरेसे मेरे जिंदगी मे आना’ हे गाणे आजही अनेकजण

डोंबिवली एसआयए महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

डोंबिवलीतील एसआयए महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली.

कुंभमेळ्याच्या आखाडा सजावटीचे काम बदलापुरात

नाशिकमध्ये बारा वर्षांनी आलेल्या कुंभपर्वात मानापमान नाटय़, शाही स्नानासाठीची तयारी, काही लाख साधूंची नाशिकमध्ये वाढती वर्दळ आदी गोष्टी घडत आहेत.

स्थानकाच्या दारातच पोलिसांचे पार्किंग

बदलापुरात फलाट क्रमांक तीनवर नव्यानेच केलेल्या छोटय़ा प्रवेशद्वारावरून रेल्वे प्रवाशांना चालणे आता जिकिरीचे झाले असून या प्रवेशद्वारी दोन्ही बाजूस दुचाकी उभ्या राहत आहेत. त्यातील धक्कादायक बाब अशी की या दुचाकींवर पोलीस असे लिहिले असून आता पोलीसच या प्रवेशद्वारावरच दुचाकी लावून …

गणेशोत्सव मंडळांना घरगुतीपेक्षा कमी दराने वीज

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणारा वीजपुरवठा वेगवेगळ्या मार्गाने घेतला जात असून, प्रामुख्याने घरगुती वापरातील वीज अनेक सार्वजनिक मंडळांकडून वापरली जाते.

शिवसेनेचा भूलभुलैया

कल्याण-डोंबिवलीतील रहिवाशांची नस ओळखलेल्या शिवसेनेने शहरातील मनोरंजनात्मक प्रकल्पांचे पालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्घाटन करण्याचा सपाटा लावला आहे.

पाहा: ‘बाहुबली’चा पडद्यामागील अविश्सनीय प्रवास

‘बाहुबली’मधील महिष्मतीचा भव्य दरबार आणि अवंतिकाचे नृत्य ही दृश्ये तर केवळ आणि केवळ तंत्रज्ञानाची कमाल असल्याचे या व्हिडिओत दिसते.

CELEBRITY BLOG : आई-वडिलांना वृद्धाश्रमात आणि मुलांना पाळणाघरात पाठवतो…कशासाठी?

वन बीएचकेच्या जागी टू बीएचके हवा म्हणून, की टू व्हीलरऐवजी फोर व्हीलर यावी म्हणून..?

इंद्राणी पैशांसाठी काहीही करू शकते – सिद्धार्थ दास

शीना आणि मिखाईल ही आमचीच मुले असून, ज्यांनी कुणी शीनाची हत्या केली आहे. त्यांना फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे, अशी भावना इंद्राणी मुखर्जीचा पहिला पती सिद्धार्थ दास याने व्यक्त केली.

सलमान खानचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणीस नकार

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला २००२ मधील वाहनाने धडक देऊन फरार होण्याच्या घटनेत (हिट अँड रन केस) मंजूर केलेला जामीन रद्द करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

राजीव मेहरिषी नवे केंद्रीय गृहसचिव

केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांनी वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचे जाहीर केल्यावर केंद्र सरकारने त्यांच्या जागी सोमवारी तातडीने ज्येष्ठ सनदी अधिकारी राजीव मेहरिषी यांची नियुक्ती केली.

तीन वर्षाच्या मुलाचा तायक्वांदो बोर्ड तोडतानाचा व्हिडिओ व्हायरल

सध्या इंटरनेटवर एका तीन वर्षांच्या मुलाचा तायक्वांदो बोर्ड तोडतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

काश्मीरशिवाय भारताशी चर्चा नाही- अझीज

भारताने द्विपक्षीय संवादात सर्व विषयांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवल्याशिवाय नव्याने चर्चा सुरू करता येणार नाही असे पाकिस्तानने म्हटले आहे.

वाशी खाडीतील ‘कचरा अर्पण’ परवानगीविना!

रेल्वेमार्गात टाकला जाणारा काही टन कचरा गोळा करून तो वाशी खाडीत टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला अंधारात ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती खुद्द अमिताभ यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

Just Now!
X