
गीताई आणि गीता प्रवचने यांची रचना करताना विनोबांनी गीतेचे केवळ अनुकरण केले नाही. त्यांनी त्या रचनांना आत्मचिंतनाचीही जोड दिली.
गीताई आणि गीता प्रवचने यांची रचना करताना विनोबांनी गीतेचे केवळ अनुकरण केले नाही. त्यांनी त्या रचनांना आत्मचिंतनाचीही जोड दिली.
जवळपास दोन दशके चाललेल्या या ‘यज्ञा’चा उल्लेख ‘आंदोलन’ असा झाला की त्यामागच्या तत्त्वज्ञानाचा विसर पडतो.
जी संस्कृती स्वत:च्या जीवनात नाही, स्वत:च्या घरात नाही, ती जगभर फैलावू पाहणे या विचारसरणीला आसुरी म्हणतात.
विनोबांनी केलेल्या दोष दिग्दर्शनाचा आरंभ स्वत:पासून होतो हा त्यांच्या विवेचनाचा विशेष आहे.
पदयात्रेमध्ये विनोबांनी व्यक्ती, समूह आणि समाज हा मोक्षाचा त्रिकोण सांगितला त्याचा आधार मानवसेवा आणि शरीरपरिश्रम असा आहे.
पदयात्रा जिथे जिथे गेली तिथे विनोबांना स्पष्टपणे दिसले की स्वातंत्र्यामुळे लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
सर्वोदय समाजाच्या अधिवेशनासाठी विनोबांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवरामपल्लीच्या दिशेने कूच केले. त्यांची ही पदयात्रा काहीशी अनपेक्षित होती.
श्रीकृष्ण, महावीर, गौतम बुद्ध, शंकराचार्य, ज्ञानेश्वर आणि गांधीजी यांच्या तत्त्वज्ञानाचा विनोबांवर प्रभाव होता.
भूदान यज्ञाच्या टोकाच्या समर्थकांना भूदान यज्ञाचा गाभा समजला होता का यावर टिप्पणी करणे कठीण आहे आणि तसे करूही नये.
विनोबांच्या मते, स्वराज्यात नकारात्मक सत्याग्रह चालणार नाही. पारतंत्र्यातील सत्याग्रह नकारात्मक होते.
साधारणपणे १९४२ पासून विनोबांनी आत्मज्ञान आणि विज्ञान यांचे ऐक्य कशाप्रकारे होऊ शकेल यावर चिंतन सुरू केले.
विनोबांचा सत्याग्रह-विचार अमान्य होऊ शकतो तथापि तो समजावून घेणे गरजेचे आहे आणि त्यातील सामाजिक साम्ययोगही!