08 July 2020

News Flash

Ishita

‘गरुड’चे चित्रीकरण आठ दिवसांत होणार

मराठी चित्रपटसृष्टीत आता विविध विक्रम होत असताना ‘गरुड’ चित्रपटाचे चित्रीकरण आठ दिवसांत करून विक्रम करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे.
या अगोदर मराठीत सलग नऊ दिवस चित्रीकरण करून विक्रम केला गेला आहे. तो विक्रम या निमित्ताने मोडला जाणार आहे. ‘गरुड’ चित्रपटाचा येथे मुहूर्त झाला. त्यासाठी सलग आठ दिवस चित्रीकरण करण्यात येणार आहे.

अपात्र कर्जदारांबाबत जिल्हा बँकेला घेराव

जिल्ह्यातील शेतकरी व गटसचिवांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला घेराव घालून अपात्र कर्जदारांना पात्र ठरवण्याबाबतचे परिपत्रक रद्द करावे, असे निवेदन बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांना दिले. कृषिमंत्री शरद पवारांनी शेतकऱ्यांना नाबार्डच्या दिल्ली येथील अधिकाऱ्यांबरोबर आठवडय़ात चर्चा घडवून आणतो, असा शब्द दिला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने अपात्र कर्जवसुलीला २८ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. दिल्ली येथील बैठकीत काय होणार, याकडेच सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ विजयी

शिवाजी विद्यापीठाच्या महिला फुटबॉल संघाने पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला फुटबॉल स्पर्धेत प्रथमच विद्यापीठाचा संघ पात्र ठरला. या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. सहा गुण घेऊन शिवाजी विद्यापीठ संघ पहिल्या क्रमांकावर राहिला. चार गुण घेऊन मुंबई द्वितीय, तर दोन गुणांसह अमरावती तृतीय क्रमांकावर व बरकतुल्ला विद्यापीठ भोपाळ चौथ्या क्रमांकावर राहिले.

कोल्हापुरातील टोल वसुलीला शिवसेनेची आग

आयआरबी कंपनीच्या टोल वसुलीच्या इराद्याला धक्का देत शिवसेनेने रविवारी मध्यरात्री शहरातील तीन नाके पेटवून दिले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करताना शिवसैनिकांनी टोल नाक्याच्या केबीनच्या साहित्याची प्रचंड नासधूस केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राज ठाकरे यांची सोलापुरात २२ फेब्रुवारीला जाहीर सभा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या २२ फेब्रुवारी रोजी सोलापुरात आणि २३ रोजी तुळजापूर व उस्मानाबादच्या दौऱ्यावर येणार आहेत. दि. २२ रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांची नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

शाहू स्मारक भवनात चित्रपट महोत्सवाचे आयोजन

येथील शाहू स्मारक भवनमध्ये २१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान ‘वुई केअर फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पवन खेबूडकर, दिलीप बापट व पी. डी. देशपांडे यांनी येथे दिली.

राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर

मनसेचे नेते राज ठाकरे हे सोमवार व मंगळवार असे दोन्ही दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. मंगळवारी होणारी त्यांची सभा उच्चांकी होईल, असे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मनसेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी रविवारी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, सोमवारी दुपारी ३ वाजता ठाकरे यांचे पॅव्हेलियन हॉटेलमध्ये आगमन होणार आहे. तिथे जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीवेळी त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. नंतर ते पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारणार आहेत. सायंकाळी निमंत्रित मान्यवरांशी त्यांची चर्चा होणार आहे.

व्होट बँक कमी होण्याच्या भीतीनेच ओबीसींची जनगणना टाळली जातेय…

देशातील व्होट बँक कमी होईल या भीतीपोटीच देशातील ओबीसींची जनगणना करण्याचे सरकारकडून जाणीवपूर्वक टाळले जात असून हा ओबीसींच्या विरोधातील राजकीय षडयंत्राचाच हा भाग असल्याचा आरोप येथे सुरू असलेल्या सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलनातील एका परिसंवादात करण्यात आला.

सिंचनावर ७१ हजार कोटी खर्च ओलिताखाली जमीन मात्र अर्धा टक्के

राज्य शासनाने सिंचनावर ७१ हजार कोटी रुपये खर्च केले असले तरी ओलिताखाली जमीन येण्याचे प्रमाण अवघा अर्धा टक्के आहे. या कामात सत्ताधाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असल्याने त्यांना सत्तेवरून हटविले पाहिजे. युतीचे सरकार सत्तेवर आल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट मंत्र्यांना तुरुंगात डांबले जाईल, असा इशारा भाजपचे सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांनी सांगली जिल्हय़ात बुधवारी दिला.

कोल्हापुरात ११ मुलांना विकण्याचा धक्कादायक प्रकार उघड

सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत जंगलात राहणाऱ्या ११ कातकरी मुलांना मेंढपाळांना विकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी दोन ते २० हजार रुपयांना विकली गेलेली ही बालके मेंढपालनास मदत करीत रानोवनी फिरत आहेत. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी बुधवारी ११ मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. उद्या गुरुवारी राधानगरी प्रांत कार्यालयात या प्रश्नी बैठक होणार असून त्यामध्ये बालकांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला जाणार आहे.

नव्या पिढीने श्रेयवादात न अडकता ध्येयवादी बनावे- डॉ. एन. जे. पवार

समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे काम या थोर व्यक्तीने केले आहे. ध्येयवादाने प्रेरित झालेली ती मंडळी होती. सध्याच्या परिस्थितीत ध्येय बाजूला पडून त्या ठिकाणी श्रेय आल्याने समाजात आत्मकेंद्रितपणा वाढला आहे. नव्या पिढीला त्यापासून धोका निर्माण झाला असल्याची भीती व्यक्त करताना नव्या पिढीने श्रेयवादात न अडकता ध्येयवादी बनले पाहिजे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी केले.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ९ फेब्रुवारी रोजी कार्यशाळा

महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने सोलापूर येथे मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कार्यशाळा शनिवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी होत असून, या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली. याच दिवशी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होत असून खासगी शाळांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा होणार आहे.

भावसार व्हिजन इंडियाच्या प्रांतपालपदी दीपक आकुडे

भावसार व्हिजन इंडियाच्या प्रांतपालपदी सोलापूरचे दीपक आकुडे यांची निवड झाली. यापूर्वी त्यांनी या संस्थेचे अध्यक्षपद सांभाळले होते. गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या संस्थेच्या अधिवेशनात या निवडीवर शिक्कमोर्तब झाले.

यंत्रमाग कामगारांचा संप मिटण्यात नेत्यांचाच अडसर

कामगारांचा सुरू असलेला संप मोडून निघावा अशी भूमिका कामगार नेतेच घेत आहेत. यंत्रमाग कामगारांचा संप मिटावा, यासाठी यंत्रमागधारक संघटना सकारात्मक पावले उचलत असताना दररोज वेगवेगळय़ा मागण्या समोर आणून ते कामगारांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी केला.

वस्तुसंग्रहालय व्यवस्थापनावर शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा

वस्तुसंग्रहालये हा त्या त्या देशाच्या जीवनात ऐतिहासिक वारसा आहे. वस्तुसंग्रहालयाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रा. भालबा विभूते यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ, प्रौढ आणि निरंतर शिक्षण व विस्तार कार्य विभाग आणि राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने वस्तुसंग्रहालय व्यवस्थापन कार्यशाळा शिवाजी विद्यापीठ शिक्षणशास्त्र सभागृह येथे आयोजित केली आहे. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

पत्नीला नांदण्यास येण्याचा आग्रह धरणाऱ्या पतीचा मारहाणीत मृत्यू

पत्नीला सासरी नांदविण्यासाठी गावाकडे घेऊन जाण्यासाठी आलेल्या मुकद्दर शमशोद्दीन काझी (वय ३१) यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. शहरातील नई जिंदगी चौकातील आनंदनगर तसेच लष्कर भागात अशा दोन ठिकाणी त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी त्याची पत्नी नाझिया व मेहुण्यासह चौघाजणांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे

कर्करोगावर उपयुक्त औषध शोधल्याचा दावा

गेली १२ वर्षे कर्करोगावर संशोधन करून तयार केलेल्या औषधांनी कर्करोगबाधित रुग्णांना आजारातून मुक्त केल्याचा दावा डॉ. प्रिया उपाध्ये यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

पंडित यांच्या शोधनिबंधास बक्षीस

संजय घोडावत शिक्षण समूहाच्या वतीने घेण्यात आलेल्या बिझनेस मॅनेजमेंट-नवी क्षितिजे या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत येथील केआयटी अभियांत्रिकी पदव्युत्तर विभागातील संशोधक विद्यार्थी शमुवेल पंडित यांनी सादर केलेल्या शोधनिबंधास प्रथम क्रमांक मिळाला.

लाडगावकर यांचा शोधनिबंध सादर

अमेरिका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत वारणानगर येथील प्रा. डॉ. बाळासाहेब लाडगावकर यांनी ‘एक्स्प्लोरिंग स्पेसेस फॉर लर्निग’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. त्यामध्ये पर्यावरण व ग्रामीण भागातील उच्च शिक्षणातील ज्वलंत समस्यांचा ऊहापोह करण्यात आला. डॉ. लाडगावकर हे यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात इंग्रजी विभागप्रमुख आहेत.

ए. डी. शिंदे यांची पुण्यतिथी

सायबर ट्रस्टचे संस्थापक डॉ. ए. डी. शिंदे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दुर्मिळ कॅमेरा, दुर्मिळ पोस्ट तिकिटे व फस्ट डे कव्हर प्रदर्शनाचा समावेश होता. रक्तदान शिबिरात १५०वर रक्तदात्यांनी रक्तदान केले. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते डॉ. शिंदे यांच्या स्मृती शिल्पस्थळावरील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

प्रा. बी. डी. चौगले यांची निवड

गुणवत्तेत तडजोड न करणाऱ्या गोकुळने गुणवंतांचे कौतुक करण्यात कधीही कसर ठेवली नाही, असे मत प्रा. बी. डी. चौगले यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या सदस्यपदी मुरगूड येथील प्रा. बी. डी. चौगले यांची निवड झाली आहे.

‘कुमार केसरी २०१३’चा आकाश महाजन मानकरी

जळगाव कुस्ती केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या कुमार केसरी स्पध्रेत कराड तालुक्यातील शेणोली गावचा सुपूत्र आकाश अर्जुन महाजन याने ‘कुमार केसरी २०१३’ चा किताब पटकावला. आकाशने मुंबईच्या सत्यजीत यादववर मात करत स्पर्धा जिंकली. गावकऱ्यांनी त्याची मिरवणूक काढून आनंद साजरा केला.

ज्येष्ठ छायाचित्रकार दत्ता भट प्रेरणा पुरस्काराचे मानकरी

शिक्षण मंडळ कराड व आत्माराम विद्यामंदिर ओगलेवाडी यांच्या वतीने देण्यात येणारा प्रेरणा पुरस्कार ज्येष्ठ छायाचित्रकार व सामाजिक कार्यकर्ते दत्ता भट यांना जाहीर झाला आहे. येत्या गुरुवारी (दि. ७) दुपारी ४ वाजता आत्माराम विद्यामंदिराच्या प्रांगणात भट यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

संध्यादेवी कुपेकर, शिंत्रे, गड्डीन्नावर यांचे अर्ज दाखल

चंदगड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी तीन प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार संध्यादेवी कुपेकर, शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंत्रे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजेंद्र गड्डीन्नावर यांचे अर्ज दाखल झाले. आतापर्यंत पंधरा उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून ६ फेब्रुवारी ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

Just Now!
X