09 July 2020

News Flash

Ishita

कोल्हापुरातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल भाजपचे आंदोलन

शहरातील वाढती गुन्हेगारी व बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात शुक्रवारी भारतीय जनता पार्टीच्यावतीने शिवाजी चौकात भाजपाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
खून, दरोडे, मारामाऱ्या, चोऱ्या आणि राजकीय वैमनस्यातून हत्या यामुळे संपूर्ण राज्यात कोल्हापूर बदनाम झाले आहे. पोलीस प्रशासन व राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊन गुन्हेगार पोसत आहे.

पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न; अनमोल पृथ्वी अभियान

अक्कलकोट येथील शिवपुरीच्या विश्व फौंडेशन व सोलापूर आकाशवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अनमोल पृथ्वी अभियान’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पर्यावरण रक्षण व संवर्धनाबाबतच्या नावीन्यपूर्ण कल्पना तथा आराखडे मागविण्यात येत आहेत. यापैकी तीन उत्कृष्ट प्रयत्न तथा प्रकल्पांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

यशवंतरावांनी चालता बोलता व स्वाभिमानी महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले- डॉ. सदानंद मोरे

यशवंतराव चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीत राज्याचे नेतृत्व करताना संत ज्ञानेश्वर, शिवाजीमहाराज, लोकमान्य टिळक, जोतिबा फुले ही मुख्य प्रतीके मानली. मराठी माणसाला जे हवे आहे ते आत्मसात करत साहित्य, कुस्ती, तमाशा, भजनाशी संगत केली म्हणूनच ते महाराष्ट्र समजूही शकले आणि बदलूही शकले, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

यंत्रमाग कामगारांचे आंदोलन तीव्र; रास्ता रोको, जेल भरो आंदोलनाचा इशारा

यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढीसाठी उद्या शनिवारी रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा शुक्रवारी झालेल्या जाहीर सभेत करण्यात आली. तर दुसरीकडे यंत्रमागधारकांच्या संघटनांमध्ये मजुरीवाढीवरून फूट पडली आहे. शहरात काही प्रमाणात यंत्रमाग कारखाने सुरू झाले असलेतरी अजूनही बरेचसे कारखाने बंद आहेत.
यंत्रमाग कामगारांनी मजुरीवाढीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

सम्राट पंडित यांची आज मैफल

दिवंगत प्रख्यात तबलावादक पं. तारानाथराव यांच्या २२ व्या स्मृतिदिनानिमित्त सोलापुरात उद्या शनिवारी, १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये शास्त्रीय गायक सम्राट पंडित यांच्या गायनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे.

वार्ताहर, कराड

शेतकऱ्याकडून शेतजमिनीच्या मोजणीसाठी शासकीय फीव्यतिरिक्त ३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील भूमिअभिलेख कार्यालयातील तत्कालीन शिरस्तेदार सलीम बापूलाल शिकलगार यास दोषी धरून येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. भावके यांनी पाच वष्रे सक्तमजुरी व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

खुनानंतर कोल्हापुरात तणाव

पाचगाव येथील माजी सरपंच अशोक पाटील यांच्या खुनानंतर कोल्हापूर परिसरात काल रात्रीपासून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी रात्री पाटील यांच्या खून प्रकरणी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत पाटील समर्थकांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय परिसरात दगडफेक व रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान आज तणावपूर्ण वातावरणात अशोक पाटील यांच्या पार्थिवावर पाचगाव येथे अंत्यविधी करण्यात आला.

पाटील खुनावरून आरोप-प्रत्यारोप

अशोक पाटील यांच्या खूनप्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी खून प्रकरणातील संशयाची सुई गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे वळली असल्याचा संशय व्यक्त करून खून प्रकरणाची नि:पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्री पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

यशवंतरावांच्या कार्याचा अभ्यास अखंड सुरू ठेवा- रावसाहेब शिंदे

यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या कार्याची माहिती आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान एवढे मोठे आहे, की ते वाचून किंवा सांगून समजणार नाही. त्यांच्या कार्याचा अभ्यास करून ते यापुढे अखंडपणे सुरू ठेवण्याची गरज असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.

परीक्षेच्या असहकारास भाजपचा आक्षेप

येथील शिक्षण उपसंचालक कोल्हापूर कार्यालयात गुरुवारी झालेल्या बैठकीवेळी दहावी व बारावी परीक्षेस शिक्षण संस्थाचालकांनी पुकारलेल्या असहकार भूमिकेविषयी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यावर शिक्षण उपसंचालक बी. बी. पायमल यांनी असहकार्याच्या भूमिकेत फेरबदल करून संस्थाचालकांकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडली जाईल, अशी ग्वाही दिली.

रिक्षा चालकांचे आंदोलन, दोनशे जणांना अटक

शिष्टमंडळाशी नव्हे तर रिक्षाचालकांशी चर्चा करावी, अशी मागणी रिक्षा संघटनांनी कायम ठेवल्याने गुरुवारी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्यांचा खटका उडाला. त्यातून मोर्चाव्दारे आलेले रिक्षाचालक, संतप्त होऊन वाद घालू लागल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. सुमारे २०० हून अधिक रिक्षाचालकांना शालिमार सभागृहात अटक करून ठेवण्यात आले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

व्हॅलेन्टाइन डेच्या विरोधात हिंदू जनजागृतीचे प्रबोधन

अलीकडे वाढत्या स्वैराचारामुळे महिलांशी संबंधित अत्याचाराचे प्रकार वाढत असतानाच आता पुन्हा ‘व्हॅलेन्टाइन डे’च्या नावाखाली युवा पिढीकडून धुडगूस घातला जात आहे. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण व मेकॉलेची शिक्षणप्रणाली यामुळे सर्वत्र स्वैराचार माजला आहे. ही अधोगती रोखण्यासाठी ‘व्हॅलेन्टाइन डे’सारखी विकृती सोडून भारतीय संस्कृती दिन साजरा करावा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीने केले आहे.

अंगणवाडी मदतनीस भरती; जि.प.कडे चौकशीची मागणी

माळशिरस तालुका पंचायत समितीअंतर्गत एकात्मिक बालविकास योजनेच्या अंगणवाडी मदतनीसपदावर आपली गुणवत्तेत निवड झाली असतानाही फसवणूक करून आपल्याकडून पंचायत समितीच्या एका महिला सदस्याने २० हजारांची रक्कम उकळल्याची आश्लेषा भारत सोरटे या महिलेने केलेल्या तक्रारीकडे याच तालुका पंचायत समितीच्या सदस्या श्रीलेखा पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

सख्ख्या भावाचा खून केल्याबद्दल आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून आपल्या सख्ख्या भावाचा निर्घृणपणे खून केल्याबद्दल भीमराव गणपत जाधव (वय ४७, रा. व्होळे, ता. माढा) यास सोलापूरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा ठोठावली. त्याची पत्नी मंगल जाधव हिची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.

गणेश जयंती वाईत उत्साहात

गणेश जयंतीचा कार्यक्रम वाईत उत्साहात साजरा करण्यात आला. येथील महागणपती मंदिरात यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गणेश जयंतीनिमित्त मंदिरात गणेशभक्तांची दर्शनासाठी रीघ लागली होती.

जनसुराज्य शक्ती पक्षाची मुद्रांक शुल्काबाबत चर्चा

रेडीरेकनरचे वाढलेले दर व मुद्रांक शुल्कातील बंद झालेल्या सवलतीबाबत बुधवारी जनसुराज्य शक्ती पक्षाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्याशी चर्चा केली. ५ लाखांपर्यंत मुद्रांक शुल्क सवलत पूर्ववत करणे व जुन्या करारनाम्यासाठी नवा दर लागू न करण्याबाबत राज्य शासनाला अहवाल पाठविण्यात येईल, असे आश्वासन या वेळी पवार यांनी दिले.

शरद पवार रविवारी सोलापूरच्या भेटीवर

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे येत्या रविवारी, १७ फेब्रुवारी रोजी सोलापुरात येत आहेत. या वेळी ते जिल्हय़ातील दुष्काळ प्रश्नावर आढावा बैठक घेतील अशी अपेक्षा आहे. सोलापूरच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या अतिरिक्त संचालकांबरोबर पवार हे डाळिंब प्रश्नावर चर्चा करणार आहेत.

दलित विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकांच्या बडतर्फीची मागणी

करमाळा तालक्यातील भाळवणी येथे एका १४ वर्षांच्या अल्पवयीन दलित शालेय मुलीचा शिक्षकांनीच विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त करीत संबंधित शिक्षकांना तातडीने बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी ‘हलगीनाद’ आंदोलन केले.

सोलापूर महापालिकेच्या आयुक्तांकडून ७२० कोटींचा अर्थसंकल्प सादर

सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करणाऱ्या सोलापूर महापालिकेचे आगामी २०१३-१४ वर्षांसाठी महसुली व भांडवली मिळून एकूण ७२० कोटी एवढा अर्थसंकल्प आयुक्त अजय सावरीकर यांनी तयार करून मंजुरीसाठी स्थायी समितीला सादर केला आहे. यात ३५४ कोटी ८९ लाखांचा महसुली तर ३६५ कोटी १३ लाखांचा भांडवली कामांचा समावेश आहे. यात पाणीदर व करवाढीचा उल्लेख नाही.

अन्नातून विषबाधेमुळे ३६ रुग्ण सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात

टिळा लावण्याच्या घरगुती कार्यक्रमात दिलेल्या भोजनानंतर विषबाधा झाल्याने उलटी-जुलाब व चक्कर येऊन त्रास सुरू झाल्याने ३६ जणांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असून, त्यापैकी बऱ्याच रुग्णांना मंगळवारी सायंकाळनंतर घरी सोडण्यात आले.
सोलापूरपासून जवळच असलेल्या निलेगाव (ता. तुळजापूर) येथे सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला.

मागेल त्याला पाण्याचे टँकर- ढोबळे

दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेली पाण्याची टंचाई अन् चाराटंचाई लक्षात घेऊन प्रत्येक गावात चारा छावणी व मागेल त्यास पाण्याचे टँकर देण्याचा शासनाचा प्रयत्न असून, सर्वच साखर कारखान्यांनी चारा छावणीसाठी १०० एकर ऊस ठेवून द्यावा, असे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सर्वाना आदेश दिले.

‘समाजवादी प्रबोधिनी’ची भूमिका रुजवण्याचा प्रयत्न

वाचनसंस्कृतीचा विकास करतानाच वैज्ञानिक समाजवादाची भूमिका समाजात रुजविण्यासाठी संघटितपणे व्यापक प्रयत्न करण्याचा निर्णय इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीच्या बैठकीत घेण्यात आला.

चांदोली, वारणा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

चांदोली अभयारण्यग्रस्त व वारणा प्रकल्पग्रस्तांच्या वर्षांनुवर्षे रखडलेल्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी, या मागणीसाठी निवळे (ता. शाहूवाडी) येथील नागरिकांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व जिल्हाप्रमुख मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेप्रमाणे ‘गोकुळ’ची स्थिती करू नका

राजकारण्यांतील कुरघोडीच्या स्पर्धेमुळेच कोल्हापूर जिल्हा बँकेची अवस्था झाली तशी ‘गोकुळ’ची करू देऊ नका, असा सल्ला कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे (गोकुळ) ज्येष्ठ संचालक आनंदाराव पाटील-चुयेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. उत्पादकांना चांगला दर द्यायचा झाला तर भविष्यात अवास्तव खर्चावर अंकुश ठेवणे आवश्यक असल्याचेही चुयेकर यांनी सांगितले.

Just Now!
X