13 July 2020

News Flash

Ishita

यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीची बैठक तोडग्याविना

इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीच्या प्रश्नी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू राहूनही त्यामध्ये निर्णय होऊ शकला नाही. कामगारमंत्र्यांच्या उपस्थितीतील सलग तिसरी बैठक फिस्कटली आहे. यंत्रमागधारक प्रतिनिधींनी ७० पैसे मजुरी व १५ टक्के बोनस देण्याचा प्रस्ताव सादर केला. पण तो कामगार प्रतिनिधींनी फेटाळून लावला. आता याप्रश्नी रविवारी (१० फेब्रुवारी) रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा प्रांत कार्यालयात बैठक होणार आहे.

उजनी धरणातील चुकीच्या पाणी नियोजनाला जबाबदार कोण?

सोलापूर जिल्हय़ासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात मागील वर्षांत ११४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. परंतु पाणीवाटपाचे नियोजन साफ चुकल्यामुळे धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला. त्यास जबाबदार कोण, असा सवाल राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपस्थित केला.

कचरा प्रकल्पाच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ शिवसेनेची निदर्शने

शहरातील झूम कचरा प्रकल्पाच्या दुरवस्थेकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना थेट प्रकल्पस्थळी येण्यास आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाग पाडून तेथील विदारक परिस्थिती दाखवून दिली. अखेर या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी आठवडय़ाभरात बैठक बोलावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी दिले.

सोलापुरात ८ फेब्रुवारीपासून तीन दिवस ‘स्थापत्य-२०१३ प्रदर्शनाचे आयोजन

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स सोलापूरच्या वतीने येत्या ८, ९ व १० फेब्रुवारी रोजी होम मैदानावर बांधकाम व अंतर्गत सजावटीविषयक ‘स्थापत्य-२०१३’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे यंदाचे सातवे वर्ष आहे.

राष्ट्रवादीला राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे आगामी निवडणुकांत उद्दिष्ट- अजित पवार

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रथम क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे, हे उद्दिष्ट घेऊन पक्षाची वाटचाल सुरू राहणार आहे. या स्वप्नाला आकार देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच झोकून देऊन जनसंपर्क वाढविला पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पन्हाळा येथे व्यक्त करत पक्षाचे ‘व्हिजन २०१४’ चा पट मांडला.

जगाच्या प्रगतीमागे ज्ञानलालसा हे कारण- गिरीश कुबेर

जग पुढे जाण्यामागे ज्ञानलालसा हे कारण आहे. पुढे जाणारे जग आपण फार कुतूहलाने पाहतो. त्यामागे मोठी ज्ञानलालसा असल्याचे मत ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. सातारा येथील श्री छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या शतकोत्तर हीरक महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमप्रसंगी कुबेर बोलत होते.

सोलापूर रेल्वेस्थानकाला ए-वन वर्गाचा दर्जा प्राप्त

विविध सुधारणांमुळे विकसित होत असलेल्या सोलापूर रेल्वेस्थानकाला रेल्वे मंत्रालयाने ए-वन वर्गाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे या रेल्वेस्थानकात आणखी सुधारणा होणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढ प्रश्नावर आज बैठक

यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढप्रश्नी निर्णय घेण्यासाठी सोमवारी दुपारी ४ वाजता इचलकरंजीतील प्रांत कार्यालयामध्ये कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. गेले १५ दिवस ५० हजार कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असून, सोमवारच्या बैठकीत तरी निर्णय लागणार का, याकडे लक्ष वेधले आहे.

अतुल मुळे यांचे निधन

वाई व कोल्हापूर येथील कापड व्यापारी अतुल भालचंद्र मुळे (वय ४०) यांचे हृदयविकाराने निधन झाले. वाईतील व्ही. एम. मुळे या कापडपेढीचे भागीदार व कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरीतील मानसी या कापड दुकानाचे मालक असलेले अतुल मुळे यांना कोल्हापूर येथील निवासस्थानीच हृदयविकाराचा त्रास झाला.

टोलविरोधी कृती समितीच्या बहिष्काराने बैठक निर्णयविना

टोलविरोधी कृती समितीचा बहिष्कार राहिल्याने शुक्रवारी मुंबईत मुख्य सचिवांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोल्हापूर शहरात रस्त्यावरील टोलआकारणीबाबत कसलाही निर्णय होऊ शकलेला नाही. मुख्य सचिवांशी जिल्हाधिकारी व आयुक्तांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा चर्चा करून आयआरबीने केलेल्या रस्त्यांच्या कामातील दोषांची सविस्तर माहिती दिली. शासनाला टोलआकारणी करण्याचे धाडस होत नाही. असे या बैठकीतून दिसून आले आहे, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया टोलविरोधी कृती समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

विनापरवाना घरकुलांविषयी महापालिकेला उशिरा जाग

तावडे हॉटेल परिसरात विनापरवाना बांधण्यात आलेल्या घरकुलांचा विषय तापू लागल्यावर शुक्रवारी महापालिकेतील अधिकारी-पदाधिकाऱ्यांना जाग आली. महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, उपायुक्त संजय हेरवाडे, स्थायी समिती सभापती राजू लाटकर यांच्यासह अधिकारी, नगरसेवकांनी जागेची पाहणी केली. महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या आधारे महापालिका हद्दीतील जागेचे रेखांकन करावे, अशा सूचना आयुक्तांनी नगरअभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले.

स्वामी विवेकानंद रथयात्रेचे कराडकरांकडून उत्स्फूर्त स्वागत

‘देश के प्यारे, जगत के दुलारे, मातृभूमी के सुपुत्र न्यारे, पधारे विवेकानंद हमारे, स्वामी चरण प्रणाम तुम्हारे’ असे अभिमानास्पद सुमधुर गीताने कराडकरांना भारून टाकणारा पाच घोडय़ांचा सजवलेला व स्वामी विवेकानंद यांची भव्य मूर्ती असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या रथयात्रेचे शहराच्या प्रमुख मार्गावरील चौकाचौकांत उत्स्फूर्त स्वागत झाले.

अनधिकृत रेल्वे तिकीट एजंटांना गुलबग्र्यात धाड टाकून पकडले

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या प्रशासनाने रेल्वे आरक्षण केंद्रावर अनधिकृत एजंटांविरुध्द मोहीम हाती घेतली आहे. यात गुलबर्गा येथे चार अनधिकृत एजंट्सना २४ आरक्षित तिकिटांसह पकडण्यात आले.

कचरा उचलण्यावरून मारहाण; नगरसेविकेसह पतिराजाला पोलीस कोठडी

रस्त्यावरील कचरा उचलण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीप्रकरणी समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीचे पर्यवेक्षक रवींद्र वडावराव (वय ५९) यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांनी अंतरिम जामीन मंजूर केला, तर काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्यासह त्यांचे पती जॉन फुलारे आदी चौघाजणांना मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. जाधव यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राज ठाकरे यांना वाळवा न्यायालयात जामीन

सन २००८ मध्ये केलेल्या वादग्रस्त विधानाच्या आरोपासंदर्भात मनसेचे नेते राज ठाकरे शुक्रवारी वाळवा येथील न्यायालयात उपस्थित राहिले. १५ हजार रुपयांचा जामीन त्यांना मंजूर करण्यात आला. या खटल्यातील अन्य सात आरोपींना यापूर्वी जामीन मंजूर झाला आहे.

सिकंदराबाद-लोकमान्य टर्मिनस सुपरफास्ट विशेष गाडीची सोय

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागावर प्रवाशांच्या सुविधांसाठी सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी येत्या ३ फेब्रुवारीपासून धावणार आहे.

कराड अर्बनचे चिंतन शिबिर सेवकांसाठी उपयुक्त- चौधरी

सेवकांमध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांचा उपयोग बँकेच्या प्रगतीसाठी करून घेण्यासाठी कराड अर्बन बँकेने आयोजित केलेला चिंतन शिबिराचा उपक्रम निश्चितच उपयुक्त व स्तुत्य आहे, असे उद्गार प्रसिद्ध संमोहनतज्ज्ञ डॉ. धनसिंग चौधरी यांनी काढले.

मंगळवेढय़ाजवळ अज्ञात मुलीचा निर्घृण खून करून मृतदेह टाकला

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे-येड्राव रस्त्यावर एका दहा वर्षांच्या मुलीचा निर्घृणपणे खून करून मृतदेह पुलाखाली टाकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली. मृत मुलीची ओळख पटली नसून, तिचा खून कोणी व कशासाठी केला, याचे कोडे उलगडले नाही. याबाबत मंगळवेढा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

काळेश्वरी देवीच्या मंदिरासाठी सर्व प्रकारची मदत- राव

मांढरदेव येथे ट्रस्टच्या वतीने नव्याने उभारल्या जाणाऱ्या भव्य श्री काळेश्वरी देवीच्या मंदिरासाठी सर्व प्रकारची मदत दिली जाईल, असे आश्वासन केतकावळे येथील लॉर्ड व्यंकटेश्वरा चॅरिटेबल अँड रिलीजन्स ट्रस्टचे अध्यक्ष व्यंकटेश राव यांनी दिले.

कचरा उचलण्याच्या वादातून हाणामारी; नगरसेविका जखमी

सार्वजनिक रस्त्यावरील कचरा उचलण्याच्या कारणावरून काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे व त्यांच्या पतीने केलेल्या हल्ल्यात रवींद्र श्रीधर वडावराव (वय ५९) यांच्यासह दोघेजण जखमी झाले. जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाजवळ गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पै. संजय पाटील खूनप्रकरणी उदयसिंह पाटील पोलीस कोठडीत

महाराष्ट्र केसरी संजय पाटील खूनप्रकरणात काल बुधवारी सातारच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एन. के. मोरे यांनी जामीनअर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या अॅड. उदयसिंह पाटील यांना आज गुरुवारी सकाळी कराड न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. ए. शेख यांच्यासमोर हजर करण्यात आले.

जैन साध्वींवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कराडमध्ये मूक मोर्चा

जैन साध्वींवर हल्ले गांभीर्याने घेऊन त्यावर शासनाने योग्य उपाययोजना करावी, या मागणीसाठी शहर परिसरातील जैन बांधवांनी कराड तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढून निवेदन सादर केले.

शालेय पोषण आहार यंत्रणेबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश

शालेय पोषण आहाराची जबाबदारी स्वतंत्र यंत्रणेकडे देण्यासंदर्भात शासनाने येत्या चार आठवडय़ांत म्हणणे सादर करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत हे आदेश दिल्याचे पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रसाद पाटील यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

इचलकरंजीत स्वच्छतेच्या मागणीसाठी ‘गांधीगिरी’

इचलकरंजी शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनल्याने सत्ताधारी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रा. शेखर शहा यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना कचरा आणि पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पद्धतीने स्वच्छतेच्या प्रश्नाची जाणीव करून दिली.

Just Now!
X