06 August 2020

News Flash

Ishita

खंडकऱ्यांच्या जमिनीसाठी धरणे आंदोलनाचा इशारा

खंडकरी शेतकरी जमीन मिळविण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या काळात धरणे आंदोलनास बसणार आहेत, अशी माहिती भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने एका पत्रकाव्दारे प्रसिध्दीस दिली आहे.

इचलकरंजीत १० डिसेंबर रोजी कामगार मेळावा

राष्ट्रीय परिषदेने केलेल्या प्रक्रियेप्रमाणे महिन्याला १० हजार रुपये वेतन म्हणजे ८ तासाच्या पाळीला ४०० रुपये वेतन मिळाले पाहिजे ही आमची मागणी किमान वेतनासह घेऊन आंदोलन उभे केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून १० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता थोरात चौक इचलकरंजी येथे कामगार मेळावा आयोजित केला आहे.

कोल्हापुरातील कलेला जागतिक दर्जा देण्यासाठी मुंबईत कला महोत्सव – पाटील

कोल्हापुरातील कलेला गुणात्मक जागतिक दर्जा आहे. इथल्या कलाकारांच्या कलाकृती व्यापकस्तरावर पोहोचण्यासाठी मुंबईत कला महोत्सव घेऊन मार्केटिंग केले जाणार आहे. या उपक्रमाला जनतेने पाठबळ द्यावे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.

बसवज्योती संदेश यात्रेचे सोलापुरात जल्लोषात स्वागत

महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी निघालेल्या बसवज्योती संदेश यात्रेचे सोलापुरात आगमन झाले. तेव्हा जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच्यासह अनेकांनी या संदेश यात्रेचे स्वागत केले.

इचलकरंजी पालिकेत टाकला कचरा

इचलकरंजी नगरपालिकेकडे कचऱ्याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यां सुवर्णा शहा यांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी चक्क पालिका इमारतीत कचरा आणून टाकला. त्यांनी या भागातील स्वच्छता तातडीने केली जावी, अशी मागणी केली. गुरुवारी झालेल्या या प्रकाराची पालिकेत दिवसभर चर्चा सुरू होती.

किणी, तासवडे टोल नाक्याविरुद्ध आंदोलनाचा इशारा

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किणी व तासवडे या टोल नाक्यांच्या ठिकाणी वाहतूकदारांची लुबाडणूक केली जाते. त्यांना मारहाण, दादागिरी असा प्रकारही केला जातो. प्रत्यक्षात जाणाऱ्या वाहनांपेक्षा टोल वसूल केली जाणारी वाहने संख्येने कमी आहेत. हा भ्रष्ट व्यवहार थांबण्याबरोबरच टोलवसुली रद्द व्हावी, याकरिता आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस महासंघाचे नेते प्रकाश गवळी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

टी-२० स्पर्धेच्या खेळाडूंची रॅली

कोल्हापुरात १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या केपीएल टी-२० स्पर्धेचे वातावरण तयार होऊ लागले आहे. संघातील खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडल्यानंतर गुरुवारी स्पर्धेच्या प्रसारासाठी शहरात खेळाडू व पदाधिकाऱ्यांनी रॅली काढली. या रॅलीला शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला.

पाणी, दुकान गाळय़ांवरून इचलकरंजी पालिकेची सभा गाजली

इचलकरंजीकरांना सतावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या आणि मुदत संपलेल्या ५७ दुकानगाळ्यांच्या फेर लिलावाची प्रक्रिया या दोन विषयावरून गुरुवारची नगरपालिकेची विशेष सभा चांगलीच गाजली. सत्तारूढ आणि विरोधकांमध्ये सातत्याने शाब्दिक खडाजंगी होत राहिली.

जोतिबा फुल्यांकडून पहिल्यांदा धर्माची चिकित्सा- इंगवले

जोतिबा फुले यांनी पहिल्यांदा धर्माची चिकित्सा केली. वेदांपासून संतसाहित्यात उतरलेला धर्म त्यांनी नाकारला; पण धर्मातर केले नाही. सत्याचा आग्रह धरण्याचा सत्यशोधक समाज त्यांना घडवायचा होता, म्हणून त्यांनी सत्यशोधक धर्म लोकांसमोर मांडला, असे मत प्राचार्य डॉ. कृष्णा इंगवले यांनी येथे व्यक्त केले.

कामगारांच्या आंदोलनांमुळे वस्त्रनगरी अशांत

मजुरीवाढ नकोच, दरमहा निश्चित दहा हजार रुपये वेतन मिळावे हा मुद्दा घेऊन इचलकरंजीतील यंत्रमाग कामगार आंदोलनात उतरण्याच्या तयारीत आहेत. मजुरी वाढीच्या त्रवार्षिक कराराची मुदत संपण्याच्या मार्गावर असताना कामगार हे पाऊल उचलणार आहेत. त्यामुळे कित्येक दशके मजुरीत ५-१० पैशांची वाढ घेऊन कामाला लागणाऱ्या कामगारांचा पवित्रा आता बदलला आहे. निश्चित (फिक्स) पगाराची भूमिका तो प्रथमच नव्या स्वरूपात घेऊन आंदोलनात उतरत असल्याने या आंदोलनाची वासलात लागते हे लक्षवेधी ठरले आहे.

झुंबरबाईसह सहा आरोपी दोषी; फाशीच्या शिक्षेबद्दल आज सुनावणी

संपूर्ण राज्यात गाजलेल्या माढा तालुक्यातील बेंदवस्ती येथील पारधी हत्याकांडप्रकरणी सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोघा मायलेकीसह सहा आरोपींना गुरुवारी दोषी धरले. तर एका आरोपीला सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. दोषी धरलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा का सुनावण्यात येऊ नये अशी विचारणा करीत न्यायालयाने अंतिम शिक्षेबद्दल उद्या शुक्रवारी सुनावणी निश्चित केली आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदाधिकारी निवडीच्या हालचाली

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी येत्या ३० नोव्हेंबर रोजी बँकेच्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत सत्ताधारी राष्ट्रवादी गटांतर्गत राजकीय हालचालींना वेग आहे. विशेषत: माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ७२ आंदोलकांचा जामीन मंजूर

ऊसदरासाठी रास्ता रोको आंदोलनात सहभागी असल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तब्बल ७२ आंदोलक कार्यकर्त्यांना पंधरा दिवसांनंतर पेठ वडगाव न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

संशोधनातून शाश्वत विकास आवश्यक- काकोडकर

भारतातील संशोधनातून शाश्वत विकास होणे गरजेचे आहे. एखादे संशोधन केल्यानंतर त्याचे प्रकाशन करून येथेच न थांबता झालेला संशोधनाचा एकत्रितरीत्या वापर करावा, यामुळे शेतकरी आणि उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणीवर मात होऊ शकेल,’ असे प्रतिपादन राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

कोल्हापूर बाजार समितीतील गैरकारभाराबद्दल संचालकांना म्हणणे मांडण्यास मुदतवाढ

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गैरकारभाराचे गंभीर आरोप असलेल्या संचालकांना आता १८ डिसेंबपर्यंत म्हणणे मांडण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी मुदतवाढ दिली आहे.

झोपडीला लागलेल्या आगीत माळशिरसमध्ये दाम्पत्याचा मृत्यू

विजेचे शॉर्टसर्कीट होऊन त्यातून एका झोपडीला लागलेल्या आगीत पती-पत्नी दोघांचा जळून जागीच मृत्यू झाला. तोंडले (ता. माळशिरस) येथे बुधवारी (दि. २८) रात्री १० वाजता ही दुर्घटना घडली.

मिथक थिएटरच्या एकांकिकेस पु. ल. देशपांडे महाकरंडक

एकांकिका स्पर्धेतील ८वा महाकरंडक मुंबईच्या मिथक थिएटरनिर्मित ‘रिश्ता वही सोच नई’ या एकांकिकेस मिळाला आहे. कलाकारांच्या या संघास ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिकही देण्यात आले.

प्रचितगडावर अपघातात गिर्यारोहकाचा मृत्यू

प्रचितगड येथे गिर्यारोहणासाठी गेलेल्या रवींद्र वस्ताद (वय ३४) हा िशक आल्याचे निमित्त होऊन खोल दरीत कोसळला. त्यातच त्याला जीव गमवावा लागला. त्याचबरोबर मध्यमवर्गीय कुटुंबाचा आधार हरपला. वस्ताद कुटुंबासाठी आर्थिक स्वरूपात मदत उभी करून त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी पाटाकडील तालीम परिसरातील तरुण पुढे आले आहेत. त्यांनी विविध सेवा, संघटना, दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले आहे.

देशमुख, जावेद आनंद व साळुंखे सुशील फोरम पुरस्काराचे मानकरी

सोलापूरच्या सुशील सोशल फोरमच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सुशीलकुमार शिंदे पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद देशमुख (बुलढाणा), प्रख्यात पत्रकार जावेद आनंद (मुंबई) व लेखक अण्णा हरी साळुंखे (सातारा) यांना जाहीर झाला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत माळशिरसमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट

माळशिरस तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल धक्कादायक लागले असून बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादीची पीछेहाट झाली आहे. वेळापूर या अति संवेदनशील ग्रामपंचायतीत सत्ताधारी शेतकरी संघटनेने सत्ता राखत संख्याबळही वाढवले. तर गेली वर्षांनुवर्षे बिनविरोध पाणीव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने चंचूप्रवेश केला.

सुवर्णजयंती रोजगार योजनेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात निदर्शने

कोल्हापूर महानगरपालिकेमधील सुवर्ण जयंती रोजगार योजनेमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या संचालिकेची चौकशी करून निलंबित करावे, या मागणीसाठी मंगळवारी शहर भाजपाच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली.

यंत्रमाग कामगारांच्या मजुरीत १४ पैशांची वाढ

महागाईमुळे यंत्रमाग कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. परिणामी काही कामगार हा व्यवसाय सोडून पंचतांराकित औद्योगिक वसाहतीत आजही कामाला जात आहेत.

यशवंतरावांची पत्री सरकारमधील जिद्द संरक्षण खाते सांभाळताना दिसली – अभ्यंकर

यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्यासाठी पत्री सरकारमध्ये काम केल्याने त्यांच्यात असलेली जिद्द ते संरक्षण खाते सांभाळताना दिसून आली. चीनने हल्ला केल्याने त्या वेळच्या सरकारला संरक्षण नावाचे क्षेत्र असल्याची जाणीव झाली.

डॉ. गेल ऑम्वेट यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार

सातारच्या संबोधी प्रतिष्ठानतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री महामाता भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांच्या गौरवार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी या वर्षी फुले, आंबेडकर-डाव्या चळवळीचे मूलभूत संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ विचारंतव डॉ. गेल ऑम्वेट यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अण्णासाहेब होवाळे व उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी दिली.

Just Now!
X