मारुती सुझुकीने अद्ययावत बलेनो प्रीमियम हॅचबॅकसाठी बुकिंग सुरू केली आहे. जी लवकरच लॉंच होणार आहे. तुम्ही Nexa आउटलेट आणि Nexa वेबसाइटला भेट देऊन ११००० रुपयांमध्ये नवीन बलेनो बुक करू शकता. याशिवाय कंपनीने असेही म्हटले आहे की नवीन बलेनो इमर्सिव्ह ड्रायव्हिंग अनुभवासाठी हेड-अप डिस्प्ले (HUD) देखील वापरले जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारच्या नवीन किंमतीबाबत मारुती कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. २०२२ मारुती सुझुकी बलेनो ही कार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात भारतात लॉंच केली जाऊ शकते. २०२२ मारुती सुझुकी बलेनो आउटगोइंग मॉडेलच्या तुलनेत नवीन डिझाइनसह येत आहे. यासोबतच यात आणखी अनेक अपडेटेड फीचर्स मिळणार आहेत.

फीचर्स

फेसलिफ्टेड बलेनोला इंटिग्रेटेड (LED DRL)सह पूर्ण एलईडी हेडलॅम्प मिळतील. तसेच क्रोम इन्सर्टसह अपडेटेड ग्रिल असेल. बलेनोला सुधारित एलईडी फॉग लाइट्स, एअर डॅम आणि रीमास्टर केलेला फ्रंट बंपर देखील या कर मध्ये तुम्हाला मिळणार आहे. पूर्वीच्या अहवालात असे म्हटले होते की बलेनो अनेक बाह्य घटकांसह डिझाइन केली जाईल जसे की नवीन अलॉय व्हील्स, रॅपराउंड टू-पीस एलईडी टेललाइट्स, इंटिग्रेटेड स्पॉयलरसह उच्च-माऊंट स्टॉप लॅम्प, शार्क-फिन अँटेना आणि बरेच काही तसेच पुन्हा डिझाइन केलेला मागील बंपर रिफ्लेक्टरसह येणार आहे.

इंजिन

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर तेच १.२-लीटर पेट्रोल इंजिन नवीन बलेनोमध्ये दिले जाण्याची शक्यता आहे. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल युनिट आणि CVT युनिटसह येईल. लॉंच झाल्यावर नवीन बलेनो थेट Hyundai i20, Tata Altroz, Toyota Glanza तसेच Honda Jazz सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल.

२०२२ मारुती सुझुकी बलेनोच्या बुकिंगची घोषणा करताना मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे ​​वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, बलेनोने भारतात प्रीमियम हॅचबॅकची पुन्हा परिभाषित केली आहे. त्यांनी असेही जोडले की १० लाखांहून अधिक युनिट्सच्या विक्रीसह, कार प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटवर राज्य करते आणि सातत्याने देशातील टॉप ५ सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्समध्ये आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2022 maruti suzuki baleno bookings commence in india launch likely in february scsm