हिरो मोटोकॉर्प या प्रसिद्ध टू-व्हीलर दिग्गज कंपनीने ‘हिरो वर्ल्ड २०२४ इव्हेंट’मध्ये मीडियम रेंजमध्ये हिरो Xtreme 125R आणि Mavrick लाँच केले आहे. तसेच कंपनीने हिरो फॉरएव्हर ही कन्सेप्ट बाइकदेखील सादर केली, जी हिरो करिझ्मा XMR २१० ची सिरीज आहे. या खास सिरीजचे नाव ‘CE001’ असे आहे. ही मोटारसायकल ग्राहकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे. ही बाईक हिरो ग्रुपचे संस्थापक डॉक्टर ब्रिजमोहन लाल मुंजाल यांना त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी कंपनीने सादर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक महत्त्वाचा टप्पा गाठून, कंपनीच्या ग्राहकांसाठी Hero CE001 मर्यादित सिरीज तयार करण्यासाठीचे पहिले पाऊल आहे. निर्मात्याने “भारतात तयार केलेली सर्वात खास बाईक” असे वर्णन केलेल्या बाईकची सिरीज स्मरणार्थ डॉक्टर ब्रिजमोहन लाल मुंजाल यांच्या वारशाचा आणि हिरो ग्रुपच्या समृद्ध इतिहासाचा पुरावा आहे. कारण मूळ करिझ्माची कल्पना डॉक्टर ब्रिजमोहन लाल मुंजाल यांच्या अध्यक्षपदी एमेरिटसच्या कार्यकाळात झाली होती. CE001 क्लासिक बाईक आदरांजली वाहिलेल्या हिरो ग्रुपच्या संस्थापकाच्या मूळ डिझाइनचे महत्त्व राखणार आहे.

हेही वाचा…Hero मोटोकॉर्पने सादर केले टू इन वन वाहन! बटण दाबताच इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये होईल ‘असं’ रूपांतर

मोटारसायकलमध्ये हलक्या वजनाच्या कार्बन फायबरपासून तयार केलेल्या बॉडीवर्कची फीचर्स आहेत, ज्यामुळे स्टॉक मॉडेलच्या तुलनेत वजनात लक्षणीय घट आहे. यामुळे रायडर्सदेखील आरामात राइडिंग करू शकतात. हिरो मोटोकॉर्पने CE001 च्या इंजिन इतर मॉडेलच्या तुलनेत पॉवर जास्त प्रमाणात बूस्ट करेल, असा अंदाज वर्तवला आहे. २१० सीसी (210 cc) सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन, २५ बीएचपी आणि २० एनएम पीक टॉर्क निर्माण करणारे ट्रेलीस फ्रेम आहे. कंपनीने यावर्षी जुलैपर्यंत CE001 चे सर्व १०० युनिट्स वितरित करणार असे वचन दिले आहे. तसेच या मॉडेलचा संपूर्ण स्टॉक ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tribute to founder on 100th birth anniversary hero motocorp unveils ce001 limited edition asp