Hyundai एक लोकप्रिय कार उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन कार्सचे मॉडेल लॉन्च करत असते. आता सुद्धा ह्युंदाईने आपली प्रीमियम हॅचबॅक कार Hyundai i20 चे जागतिक पदार्पण केले आहे. जे लवकरच युरोपियन बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होणार आहे. कंपनी लवकरच ही कार भारतातही लॉन्च करू शकते. नवीन i20 मध्ये कोणकोणते बदल करण्यात आले आहेत याबद्दल जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Hyundai i20 ची ही तिसरी जनरेशन कार आहे. कंपनीने याचे इंटेरिअर आणि बाहेरील भागांमध्ये काही खास बदल केलेले नाही आहेत. फक्त याच्या बंपर आणि ग्रीलमध्ये त्रिकोल बदल करण्यात आले आहेत. याशिवाय त्याच्या बाजूला दोन मोठ्या बाणासारख्या रेषा दिसतात. कारची फ्रंट साईड थोडी मोठी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याच्या आधीच्या व्हेरिएंटमध्ये १६ इंच आणियाच्या पुढच्या व्हेरिएंटमध्ये १७ इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

हेही वाचा : लवकरच लॉन्च होणार Kia Seltos Facelift २०२३, जाणून घ्या ‘या’ प्रमुख गोष्टी

फीचर्स

नवीन i20 सर्वात मोठा बदल हा ADAS फीचर देऊन करण्यात आला आहे. ज्यामध्ये कंपनीने लेन असिस्ट आणि फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग फिचर दिले आहे. तर हे मॉडेल युरोपीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करताना त्याच्या सर्व एलईडी लाइट्समध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. ह्युंदाई कंपनीने आपल्या लोगोचे ठिकाण या मॉडेलमध्ये बदलले आहे. ते ग्रीलमधून काढून टाकण्यात आले आहे आणि नवीन २D च्या डिझाईनमध्ये त्याला बोनेटच्या बेसवर शिफ्ट करण्यात आले आहे.

ह्युंदाईने ने i20 फेसलिफ्टचे केले जागतिक पदार्पण (Image Credit- Financial Express/Hyundai)

इंजिन आणि गिअरबॉक्स

युरोपीय बाजारपेठेमध्ये कंपनीच्या या कारला १.० लिटर टर्बो इंजिन ज्याच्याशी ४८v माईल्ड हायब्रीड टेक्नॉलॉजी कनेक्ट करण्यात आली आहे. यासह ६-स्पीड मॅन्युअल आणि ७-स्पीड DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स कंपनीने दिला आहे.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 14 May: पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले? पाहा तुमच्या शहरातील आजच्या किमती

Hyundai i20 फेसलिफ्ट नुकतीच जागतिक बाजारपेठेमध्ये सादर करण्यात आली आहे. काही महिन्यांनी त्याचे लॉन्चिंग भारतात देखील होऊ शकते. हे मॉडेल भारतात लॉन्च झाल्यावर देशांतर्गत टाटा अल्ट्रोझ, टोयोटा ग्लांझा आणि मारुती सुझुकी बलेनो या वाहनांशी स्पर्धा करू शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyundai motors launch i 20 facelift adas feature global debut india launch soon check details tmb 01