Best Selling Car: भारतीय बाजारात कारची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. गेल्या काही महिन्यात गाड्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. भारतीय बाजारपेठेत सात सीटर एसयुव्ही आणि एमपीव्ही गाड्यांना नेहमीच मोठी मागणी असते आणि ग्राहकही मोठ कुटुंब असल्याने जास्त सदस्य बसू शकतील अशा गाड्यांना पसंती देत असतात. अलीकडच्या काळात ही मागणी फार वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात कंपन्या नव्या गाड्या बाजारात आणण्याची शक्यता आहे. पण बाजारात सध्याही अशा अनेक एसयुव्ही आणि एमपीव्ही आहेत ज्यांना ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ही देशातील सर्वात लोकप्रिय MPVs पैकी एक आहे. टोयोटा इनोव्हा नेमप्लेटखाली दोन कार विकते. इनोव्हा क्रिस्टा आणि इनोव्हा हायक्रॉस. टोयोटाची इनोव्हा हायक्रॉस फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार होती, एकूण ५ हजार ४१० युनिट्सची विक्री झाली.

Toyota Innova Crysta कारच्या विक्रीत किती वाढ झाली?

त्याचवेळी, इनोव्हा क्रिस्टा कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे, परंतु जर तुम्ही वार्षिक आधारावर विक्रीतील वाढीबद्दल पाहिलात तर, तुम्हाला आकडा वाचून आश्चर्य वाटेल. या कारच्या विक्रीत १ लाख ५३ हजार ४५० टक्के वाढ झाली आहे. खरं तर, फेब्रुवारी २०२३ मध्ये इनोव्हा क्रिस्टाच्या फक्त दोन युनिट्सची विक्री झाली होती, तर या वर्षी फेब्रुवारी २०२४ मध्ये ३ हजार ०७१ युनिट्सची विक्री झाली.

(हे ही वाचा:Tata Punch आणि Hyundai Exter समोर तगडं आव्हान, Kia ची देशात येतेय लहान SUV कार, पाहा काय असेल खास…)

Toyota Innova Crysta किंमत

Toyota Innova Crysta कारची किंमत १९.९९ लाख रुपये ते २६.३० लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे चार ट्रिममध्ये येते. G, GX, VX आणि ZX. यात पाच मोनोटोन रंगांचा पर्याय आहे. हे ७-सीटर आणि ८-सीटर सीटिंग लेआउटमध्ये येते.

Toyota Innova Crysta इंजिन

Crysta मध्ये BS6, फेज-२ अपडेटेड २.४-लिटर डिझेल इंजिन आहे. हे इंजिन १५०PS आणि ३४३Nm जनरेट करते. यामध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय नाही, फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध आहे. या रियर-व्हील-ड्राइव्ह कारमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ६-स्पीकर साउंड सिस्टम आणि ८-वे पॉवर ड्रायव्हर सीट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा सुरक्षा वैशिष्ट्ये

यात ७ एअरबॅग्ज, EBD सह ABS, वाहन स्थिरता नियंत्रण, रीअरव्ह्यू कॅमेरा आणि सर्व सीट थ्री-पॉइंट सीटबेल्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. हे बाजारात Kia Carens च्या टॉप व्हेरियंटशी स्पर्धा करते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toyota innova crysta sales increased by 1 lakh 53 thousand 450 percent in one year pdb