टू व्हीलर सेक्टरमध्ये स्कूटर सेगमेंटला मोठी मागणी आहे. यामध्ये कमी बजेटच्या मायलेज स्कूटर ते प्रीमियम फीचर्ससह स्कूटर सहज उपलब्ध आहेत. जर तुम्ही नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही येथे १२५ सीसी सेगमेंटच्या दोन लोकप्रिय स्कूटर्सचे संपूर्ण तपशील पाहू शकता. या स्कूटर स्टाइलसह लांब मायलेज देतात. या तुलनेसाठी आज आमच्याकडे TVS Jupiter 125 आणि Suzuki Access 125 आहेत. तुम्हाला या दोन्हीची किंमत ते फीचर्सपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

TVS Jupiter 125: कंपनीने टीव्हीएस ज्युपिटर १२५ अपडेट करत नव्या अवतारासह लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये कंपनीने १२४.८ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. इंजिन जास्तीत जास्त ८.१५ पीएस पॉवर आणि १०.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीमसाठी कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे संयोजन दिले आहे, यात अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहेत. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, टीव्हीएस ज्युपिटर १२५ स्कूटर ५० किमीचा मायलेज देते. टीव्हीएस ज्युपिटर १२५ ची सुरुवातीची किंमत ७५,६२५ रुपये आहे. टॉप व्हेरियंटवर ८२,५७५ रुपयांपर्यंत जाते.

इलेक्ट्रिक वाहतुकीच्या ‘व्हिडा’ या नवीन ब्रॅण्डची घोषणा; डॉ. मुंजाल म्हणाले, “भविष्याचा विचार करून…”

Suzuki Access 125: सुझुकी अॅक्सेस १२५ स्कूटर ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. कंपनीने सहा प्रकारांसह बाजारात लाँच केली आहे. कंपनीने याला १२४ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे जे ८.७ पीएस पॉवर आणि १० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. स्कूटरच्या मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही सुझुकी अॅक्सेस १२५ स्कूटर ५७.२२ किमीचा मायलेज देते. हा मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. सुझुकी अॅक्सेस १२५ ची सुरुवातीची किंमत ७५,६०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे जी त्याच्या टॉप व्हेरिएंटमध्ये गेल्यानंतर ८४,८०० रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tvs jupiter 125 vs suzuki access 125 know price mileage and feature rmt