फोक्सवॅगननं भारतात मध्य आकाराची सेडान वर्टस लाँच केली आहे. ही गाडी फोक्सवॅगन वेन्टोची जागा घेईल. जर्मन कार उत्पादक कंपनीने दावा केला आहे की, गाडीचं उत्पादन भारतात होणार असून २५ हून अधिक देशात निर्यात केली जाईल. फोक्सवॅगनने अधिकृतपणे आपली वर्टस सेडान कार भारतात लाँच होण्यापूर्वी सादर केली आहे. कंपनी आता मे २०२२ मध्ये लाँच करेल. कारचे प्री-बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. या गाडीची स्पर्धा मारुती सुझुकी सियाझ, ह्युंदाई वर्ना, होंडा सिटी आणि स्कोडा स्लॅविया या गाड्यांशी असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोक्सवॅगन वर्टसच्या एक्सटीरियर्समध्ये एल आकाराचे एईजी जीआरएलसह एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, क्रोम सराउंडसह सिंगल स्लेट ग्रिल, दोन्ही बाजूंना फॉग लाइट्स असलेला रुंद एअर डॅम, कॉन्ट्रास्ट ब्लॅक ORVM,नवीन १६-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील,जीटी यांचा समावेश आहे. समोरच्या फेंडर्सवर लाइन बॅजिंग, दरवाजाच्या हँडल्ससाठी क्रोम इन्सर्ट, शार्क-फिन अँटेना, रॅप-अराउंड एलईडी टेललाइट्स, बूट-माउंटेड नंबर प्लेट रिसेस आणि बूट-लिडवर वर्टस लेटरिंग असे फिचर्स दिले आहेत. लाँच केल्यावर भारतीय बाजारपेठेसाठी सहा रंगांमध्ये उपलब्ध असेल. वर्टसमध्ये ४० सुरक्षा फिचर्स आहेत. सहा एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, मल्टी कोलिजन ब्रेक, हिल होल्ड कंट्रोल, टायर प्रेशर वॉर्निंग यासारखे फिचर्स आहेत.

फोक्सवॅगन वर्टसच्या अंतर्गत वैशिष्ट्यांमध्ये Apple CarPlay आणि Android Auto सह १०-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, हवेशीर फ्रंट सीट्स, इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल यांचा समावेश आहे. नवीन फोक्सवॅगन वर्टसमध्ये १.०-लीटर, तीन-सिलेंडर, टीएसआय पेट्रोल इंजिन आणि १.५ लिटर, चार-सिलेंडर, टीएसआय पेट्रोल इंजिन आहे. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये मानक सहा-स्पीड मॅन्युअल युनिट समाविष्ट आहे, तर सहा-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर स्वयंचलित युनिट आणि सात-स्पीड डीसीटी युनिट पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Volkswagen virtus has made its world premiere in india booking start rmt