BR Shetty News: भारतीय वंशाचे उद्योगपती बीआर शेट्टी यांचे नाव एकेकाळी करोडपती उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट होते, मात्र एका ट्विटने त्यांचे नशीब बदलले. ते एकूण १८ हजार कोटी रुपयांचा म्हणजेच सुमारे ३.१५ अब्ज डॉलर्सचे मालक होते. त्यांच्याकडे दुबईत अनेक व्हिला, रोल्स रॉयस आणि मेबॅक यांसारख्या आलिशान कार आणि खासगी जेट होते. पण बदलत्या काळानुसार बीआर शेट्टींच्या १८ हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मूल्य केवळ ७४ रुपये झाले. गेल्या दशकात दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीचे हे अतिशय गुंतागुंतीचे प्रकरण आहे. या कंपनीच्‍या तळापासून वाढण्‍याची संपूर्ण कहाणी जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचाः २००० रुपयांच्या नोटेबाबत RBI गव्हर्नरांचे मोठे वक्तव्य, दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

बी. आर. शेट्टी यांनी या कंपनीची सुरुवात केली

बावगुथू रघुराम शेट्टी कामाच्या नवीन संधी शोधण्यासाठी केवळ ८ डॉलर्स घेऊन आखाती देशात पोहोचले होते. रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी UAE मध्ये NMC Health नावाची सर्वात मोठी आरोग्य कंपनी स्थापन केली होती. काही वर्षांतच त्यांचे नाव दुबईसह जगातील श्रीमंतांच्या यादीत आले. बीआर शेट्टी यांनी बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीत दोन मजले २५ दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले होते. बीआर शेट्टी हे करोडपती भव्य पार्ट्यांसाठीही ओळखले जात होते.

हेही वाचाः Money Mantra : ICICI बँकेकडून फेस्टिव्ह बोनांझाला सुरुवात, तुम्हाला २६००० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार

२०१९ मध्ये एका ट्विटने नशीब बदलले

२०१९ मध्ये यूके स्थित कंपनी मडी वॉटर्सच्या एका ट्विटने बीआर शेट्टीची कंपनी दिवाळखोरीत निघाली. मड्डी वॉटर हे कार्सन ब्लॉक नावाच्या शॉर्ट सेलरद्वारे चालवले जात होते. या ट्विटनंतर या शॉर्ट सेलर कंपनीने बीआर शेट्टी यांच्या कंपनीचा अहवाल प्रसिद्ध केला. कंपनीवर १ अब्ज डॉलर्सचे कर्ज लपवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. हा अहवाल आल्यानंतर एनएमसी आरोग्याची स्थिती इतकी वाईट झाली की १८ हजार कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली कंपनी इस्रायल आणि यूएईस्थित कंपनीला अवघ्या १ डॉलरला विकली गेली. यानंतर त्याच्या मूल्यांकनात सतत घट होत गेली आणि शेवटी ही कंपनी केवळ १ डॉलरच्या किमतीला विकली गेली.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Millionaire br shetty became a pauper because of just one tweet his 18 thousand crores company was valued at just 74 rupees vrd