JEE Main 2023 Registration: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडुन जेईई मेन परीक्षेच्या पहिल्या सत्राची नोंदणी करण्यासाठी देण्यात आलेला कालावधी आज संपणार आहे. पहिल्या सत्रासाठी नोंदणी करण्याची आज शेवटची तारीख आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी नोंदणी करायची आहे ते jeemain-nta.nic.in. या अधिकृत वेबसाईटवर आज नोंदणी करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेईई मेन परीक्षेच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. ही परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार आहे. पहिले सत्र २४ जानेवारी ते ३१ जानेवारी यादरम्यान असेल. तर दुसरे सत्र २०२३ मधील ६ एप्रिल ते १२ एप्रिलच्या दरम्यान असेल. ज्या विद्यार्थ्यांनी अजुनही परीक्षेसाठी नोंदणी केली नाही त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. नोंदणी कशी करायची जाणून घ्या.

आणखी वाचा- Maharashtra Talathi Bharti 2023: तलाठी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज कसा करायचा जाणून घ्या

जेईई मेन २०२३ परीक्षेसाठी नोंदणी करण्याच्या सोप्या स्टेप्स

  • jeemain-nta.nic.in. या अधिकृत वेबसाईटवर लॉगइन करा.
  • होम पेजवरील ‘JEE(Main) Application Session 1’ या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर स्क्रीनवर नवीन पेज येईल, त्यावर अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड सबमिट करून साइनइन करा
  • अ‍ॅप्लिकेशनमध्ये विचारण्यात आलेली सर्व आवश्यक माहिती सबमिट करा. आवश्यक कागदपत्र अपलोड करा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व बरोबर आहे का ते तपासा.
  • फी भरून अ‍ॅप्लिकेशन सबमिट करा.
  • सबमिट केल्यानंतर तुमच्या माहितीसाठी याची प्रिंट आउट काढून घ्या.

जे विद्यार्थी जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण होऊन २.५ लाख रँकमध्ये असतील ते जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरतील. जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया ३० एप्रिलपासून सुरू होणार आहे, तर ही परीक्षा ४ जून रोजी होणार आहे.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jee main 2023 session 1 exam last day for registration know easy steps pns
First published on: 12-01-2023 at 12:21 IST