सुहास पाटील
suhassitaram@yahoo.com
न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) (भारत सरकारचा उपक्रम), मुंबई.
३०० अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स (जनरालिस्ट) (स्केल-1) पदांची भरती.
(Ref. No. CORP.HRM/AO/२०२१ २४.०८.२०२१)
(अजा – ४६, अज – २२, इमाव – ८१, ईडब्ल्यूएस- ३०, खुला – १२१, एकूण ३००) (एकूण १७ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव एचआय – ४, व्हीआय – ३, ओसी – ३, आयडी/मल्टी – ७)
पात्रता – (दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजी) कोणत्याही शाखेतील पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/दिव्यांग किमान ५५% गुण.)
वयोमर्यादा – (दि. १ एप्रिल २०२१ रोजी) २१ ते ३० वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ एप्रिल १९९१ ते १ एप्रिल २००० पर्यंतचा असावा.) (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे)
वेतन – बेसिक पे रु. ३२,७९५/-, अंदाजे दरमहा वेतन रु. ६०,०००/-.
निवड पद्धती – फेज-१ – ऑनलाइन पूर्व परीक्षा – (अंदाजे ऑक्टोबर २०२१ मध्ये) वस्तुनिष्ठ प्रश्न १०० गुणांसाठी (इंग्लिश भाषा – ३० गुण, रिझिनग अॅबिलिटी – ३५ गुण, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड- ३५ प्रश्न, प्रत्येकी वेळ २० मिनिटे, एकूण वेळ १ तास.)
फेज-२ – मुख्य परीक्षा – (अंदाजे नोव्हेंबर २०२१ मध्ये) वस्तुनिष्ठ प्रश्न चाचणी २०० गुणांसाठी आणि वर्णनात्मक चाचणी ३० गुणांसाठी. दोन्ही चाचण्या ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील.
वस्तुनिष्ठ प्रश्न चाचणी – २०० गुण, वेळ २ तास ३० मिनिटे. (रिझिनग – ५० गुण, वेळ ४० मिनिटे; इंग्लिश भाषा – ५० गुण, वेळ ४० मिनिटे; सामान्यज्ञान- ५० गुण, वेळ ३० मिनिटे; क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – ५० गुण, वेळ ४० मिनिटे)
वर्णनात्मक चाचणीचा कालावधी ३० मिनिटे. गुण – ३०. इंग्लिश भाषा चाचणी (पत्र लेखन – १० गुण, निबंध लेखन – २० गुण)
वस्तुनिष्ठ प्रश्न चाचणीमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.
फेज-३ – मुलाखत- मुख्य परीक्षेतून उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातील.
अंतिम निवड – मुख्य परीक्षा लेखी वस्तुनिष्ठ चाचणीसाठी ७५ गुणांचे वेटेज आणि मुलाखतीसाठी २५ गुणांचे वेटेज देवून एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
फेज-१ पूर्व परीक्षा केंद्र – महाराष्ट्रातील अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/नवी मुंबई/ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी.
फेज-२ मुख्य परीक्षेसाठी केंद्र – महाराष्ट्रातील मुंबई/ठाणे/नवी मुंबई, पुणे.
परीक्षापूर्व प्रशिक्षण – अजा/अज/इमाव/दिव्यांग उमेदवारांना परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाइन अर्ज करताना तशी नोंद करावी लागेल.
प्रोबेशन कालावधी १ वर्षांचा असेल जो आणखी ६ महिन्यांसाठी वाढविला जावू शकतो.
अर्जाचे शुल्क – अजा/अज/दिव्यांग रु. १००/- इतर उमेदवारांना रु. ७५०/-.
ऑनलाइन अर्ज नोंदणी http://newindia.co.ion या संकेतस्थळावर २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत करावी.