AIESL Recruitment 2024 : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) द्वारे भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत “विमान तंत्रज्ञ”च्या (Aircraft Technicians”) विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. या मोहिमेंतर्गत एकूण १०० जागा उपलब्ध आहेत. पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ आहे. AIESL ची अधिकृत वेबसाइट http://www.aisl.in आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

AIESL Recruitment 2024- शैक्षणिक पात्रता
विमान तंत्रज्ञ (Aircraft Technicians”) या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराकडे DGCA ने नियम १३३ब अंतर्गत ६०% गुण/समतुल्य श्रेणी (SC/ST/OBC उमेदवारांसाठी ५५% किंवा समतुल्य श्रेणी)मान्यताप्राप्त संस्थेमधून एएमई डिप्लोमा/एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगचे प्रमाणपत्र (0२ किंवा ०३ वर्षांचा अनुभव असावा. सध्याच्या यादीनुसार, DGCA मंजूर AME प्रशिक्षण संस्थांचे उमेदवार पात्र आहेत किंवा केंद्र/राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त समतुल्य संस्थेमधून मेकॅनिकलमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा (३ वर्षे). /एरोनॉटिकल अभियांत्रिकी किंवा ६०% गुण/समतुल्य श्रेणी (SC/ST/OBC उमेदवारांसाठी ५५ % किंवा समतुल्य श्रेणी) सह उतीर्ण असावे.

हेही वाचा- पुण्यातील IIITमध्ये नोकरीची संधी! पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज; मिळेल चांगला पगार!
.
AIESL Recruitment 2024 – वयोमर्यादा
विमान तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार सामान्य/EWS वर्गासाठी ३५ वर्षे आहे, OBC वर्गासाठी ३८ वर्षे आहे तर SC/ST गटासाठी ४० वर्षे आहे.

अधिसुचना – https://www.aiesl.in/Doc/Careers/Notification-2024-Aircraft-Technician.pdf

हेही वाचा –IAF Agniveervayu Recruitment 2024 : अग्निवीर वायू भरतीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ, लवकर करा अर्ज

विमान तंत्रज्ञ या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत आणि वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची २३ फेब्रुवारी२०२४ आहे हे लक्षात ठेवा. मुदत संपल्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aiesl recruitment 2024 ai engineering services limited bharti 2024 this is the last date snk