Indian Navy SSC Recruitment 2025: भारतीय नौदलात नोकरीची चागंली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे भारतीय नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशनने ऑफिसर पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २७० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२५ आहे. भारतीय नौदल एसएससी अधिकारी भरती २०२५ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय नौदल सध्या जानेवारी २०२६ च्या अभ्यासक्रमासाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स (SSC) साठी अर्ज मागवत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांचे अर्ज भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindianavy.gov.in वर ऑनलाइन सबमिट करू शकतात.

Indian Navy SSC Recruitment 2025: पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता: रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित शाखेत किमान ६० टक्के गुणांसह BE किंवा B.Tech केलेले असावे. जनरल सर्व्हिस, पायलट, नेव्हल ऑपरेशन्स ऑफिसर आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर शाखा/केडरसाठी एखाद्याने अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे. लॉजिस्टिक्ससाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी एमबीए असणे आवश्यक आहे. शिक्षण शाखेसाठी उमेदवाराने M.Tech किंवा Msc केलेले असावे.

Indian Navy SSC Recruitment 2025 वयोमर्यादा: उमेदवाराचा जन्म जानेवारी २००१ ते जुलै २००६ दरम्यान झालेला असावा.

Indian Navy SSC Recruitment 2025 अर्ज कसा करावा?

  • नौदलाच्या वेबसाइटवर जा, joinindiannavy.gov.in.
  • दिलेल्या ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा.
  • अर्ज भरा.
  • विचारल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज फी भरा.
  • अर्ज सबमिट करा आणि प्रिंट करा वर क्लिक करा.

Indian Navy SSC Recruitment 2025 निवड प्रक्रिया :

उमेदवाराला पदवीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. त्यानंतर अंतिम निवड SSB मुलाखतीतील कामगिरीवर आधारित गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. “रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार आणि संबंधित प्रवेशासाठी वैद्यकीय मंजुरीनुसार सर्व प्रवेशांसाठी SSB गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाईल. वैद्यकीय परीक्षेत तंदुरुस्त घोषित केलेल्या उमेदवारांची प्रवेशातील रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार नियुक्ती केली जाईल,”

Indian Navy SSC Recruitment 2025 शाखा

कार्यकारी शाखा : सामान्य शाखा, पायलट, नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर, एअर ट्रॅफिक कंट्रोलर, लॉजिस्टिक, नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट (NAIC)

शिक्षण शाखा : शिक्षण तांत्रिक शाखा : अभियांत्रिकी शाखा (सामान्य सेवा), इलेक्ट्रिकल शाखा (सामान्य सेवा), नौदल कन्स्ट्रक्टर.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian navy ssc recruitment 2025 begins for 270 posts selection via interview know how to apply srk