SSB Bharti 2023: सशस्त्र सीमा बल अंतर्गत असिस्टंट कमांडंट पदाच्या काही रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी सशस्त्र सीमा बल विभागाने नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत १७ रिक्त जागा भरल्या जाणार असून त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना त्यांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सशस्त्र सीमा बल भरती २०२३

पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट

एकूण रिक्त पदे – १३

शैक्षणिक पात्रता – इंजिनीअरिंग पदवी

वयोमर्यादा – ३५ वर्षे

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ ऑक्टोबर

अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in

पगार – भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना ५६ हजार १०० रुपये ते १ लाख ७७ हजार ५०० रुपयांपर्यंत पगार मिळणार.

सूचना –

  • भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1FToUCvKs4Cjgu4BWVLXhovMK5L09uRAB/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ssb bharti 2023 opportunity for engineers to get government jobs recruitment for assistant commandant post in the armed forces has started jap