Success Story: यूपीएससीची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा समजली जाते. यूपीएससीमध्ये यश मिळवण्याचे स्वप्न अनेक तरुणांचे असते. पण, अनेक प्रयत्न करूनही बहुतेक जण ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत किंवा या परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. काही जण अगदी कमी वयातच त्यांची स्वप्न पूर्ण करतात. अशीच गोष्ट आहे अन्सार शेख या आयएएस अधिकाऱ्याची. IAS अन्सार शेख २०१६ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी यूपीएससी सीएसई (CSE) परीक्षा उत्तीर्ण करणारा देशाला सर्वांत तरुण आयएएस अधिकारी ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्सार शेखचे वडील मराठवाडा, महाराष्ट्र येथे ऑटोरिक्षाचालक म्हणून काम करायचे. पण, त्यांना दारूचे व्यसन होते. त्याची आई पूर्वी शेतात काम करायची. आर्थिक अडचणींमुळे त्याच्या धाकट्या भावाने इयत्ता सातवीमध्ये शाळा सोडली आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोटार गॅरेजमध्ये काम केले. काम करता करता धाकट्या भावाने यूपीएससीच्या तयारीत अन्सार शेखचीही मदत केली, त्यामुळे अन्सार शेख याचे बालपण आणि त्याचा यूपीएससीचा प्रवास कोणत्याही कष्टापेक्षा कमी नव्हते.

हेही वाचा…Success Story: चाळीतली छोटीशी खोली, अभ्यासासाठी शेजारच्यांचा वायफाय; तारेवरची कसरत करत आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण; वाचा अभिषेकचा प्रेरणादायी प्रवास

गरिबीचा यशाशी काहीही संबंध नाही :

बरेच लोक गरीब असल्याचं कारण पुढे करतात. पण, गरिबीचा यशाशी काहीही संबंध नसतो हे लक्षात ठेवा. फक्त तुमच्यात मेहनत, ध्येय आणि दृढनिश्चय असला पाहिजे. अन्सार शेख याच्या यशात त्याच्या कुटुंबाचा, मित्रांचा मोठा वाटा आहे. अन्सार शेख याचा भाऊ, मित्रांच्या मानसिक, आर्थिक पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते, असे त्यानी म्हटले आहे.

तुमची स्पर्धा स्वतःशीच असते :

ज्यांना वाटते की आपण इतर हजारो इच्छुकांशी स्पर्धा करत आहोत, तर आपण हा चुकीचा विचार करत आहोत. तुमची स्पर्धा ही स्वतःशी असते. एकदा का परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना हे समजले की त्यांना यश मिळेल एवढं नक्की… अन्सार शेख याच्या कुटुंबात शिक्षणाला कधीच प्राधान्य दिले गेले नाही. तो घरगुती हिंसाचार, बालविवाह जवळून पाहत मोठा झाला होता आणि अखेर तो यूपीएससी सीएसई (CSE) परीक्षा उत्तीर्ण करणारा देशाला सर्वांत तरुण आयएएस अधिकारी ठरला.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of ansar shaikh who become selected for the the union public service commission ias post officer at age twenty one asp
Show comments