रेल्वेतील नोकरी म्हणजे सुरक्षित आणि चांगली असा समज असतो. याचा फायदा घेण्याची संधी नुकतीच चालून आली आहे. भारतीय रेल्वेमध्ये मोठी नोकरी भरती केली जाणार आहे. परिक्षार्थी विद्यार्थांनी त्यासाठी अर्ज भरले आहेत. रेल्वेकडून ही परिक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे. त्यामुळे परिक्षार्थी विद्यार्थ्यांची होणारी तारांबळ टाळण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत. बिहार-मुझफरनगर आणि तेलंगना-सिंकदराबाद यादरम्यान दोन विशेष रेल्वे धावणार आहेत. या ट्रेनमधील सर्व बोगी या परिक्षार्थीसाठी अनारक्षित असतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोको पायलट आणि टेक्निशियन पदासाठी ६६, ५२० जागांसाठी परिक्षा होणार आहे. यासाठी ४८ लाख जणांनी अर्ज दाखल केला आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत रेल्वेची परिक्षा वेगवेगळ्या ठिकाणावर होणार आहे. १०, १३, १४, १७, २०, २१, २९, ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी रेल्वेची ऑनलाईन परिक्षा वेगवेगळ्या केंद्रावर होणार आहे.

बुधवार आज दुपारी ट्रेन क्रमांक ०५२८९ मुजफ्फरनगर-सिंकदराबाद दुपारी निघणार आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता ही गाडी सिंकजराबाद स्थानकावर पोहचेल. ०५२९० शुक्रावारी रात्री सिंकदराबादहून निघेल आणि रविवारी दुपारपर्यंत मुजफ्फरनगरमध्ये पोहचणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक ०३२४१ दानापूरहून मंगळवारी सकाळी ११ वाजून ३० मिनीटांनी सिंकदराबादला रवाना होणार आहे. ही ट्रेन आरा, बक्सर, थिवकी, सतना, जबलपूर आणि नागपूर स्थानकाहून जाणार आहे. याशिवाय ट्रेन क्रमांक ०३२५३ पटनाहून इंदौरसाठी मंगळवारी ०५.०५ वाजता निघणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rrb recruitment railway online exam today updates alp technicians