एका अत्यंत संतापजनक गुन्ह्याच्या घटनेप्रकरणी केरळ न्यायालयाने निकाल सुनावला आहे. केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील करींबा गावातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका ९० वर्षीय थेरड्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तीन वर्षांच्या शिक्षेव्यतिरिक्त फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश सतीश कुमार यांनी, दोषीला २०२० मध्ये त्याच्या शेजारी राहत असलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

या आदेशाची पुष्टी करणाऱ्या विशेष सरकारी वकील निशा विजयकुमार यांनी सांगितले की, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलम ७ अंतर्गत लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी त्या व्यक्तीला दोषी ठरवण्यात आले आहे आणि शिक्षा झाली आहे.

पोक्सो कायद्याच्या कलम ७ अंतर्गत या गुन्ह्यासाठी कमीत कमी तीन वर्षे आणि जास्तीत जास्त ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आहे. याशिवाय, ९ साक्षीदार आणि अनेक कागदपत्रे तपासल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले असल्याची माहिती एसपीपी यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 90 year old man sentenced to 3 years in prison for sexually assaulting minor girl kerala court verdict msr