प्रकृती अस्वस्थामुळे आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा विदर्भ दौरा रद्द करण्यात आला आहे. परंतु, नागपूरमध्ये होणाऱया पक्षाच्या फंड वाढीसंदर्भातील कार्यक्रमाला केजरीवाल जातीने उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या ‘फंड कलेक्टींग’ कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
केजरीवाल विदर्भातील गारपीटग्रस्त शेतकऱयांच्या भेटीला जाणार होते. परंतु, काल (बुधवार) मुंबई दौऱयानंतर केजरीवालांची प्रकृतीत खालावली त्यामुळे विदर्भ दौरा रद्द करावा लागला असल्याचे पक्षाच्या सुत्रांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ दौरा रद्द झाल्यामुळे केजरीवाल यांची उद्या नागपूरमध्ये जाहीर सभा होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्येच केजरीवालांचा ‘डीनर विथ केजरीवाल’ कार्यक्रम होणार आहे. यात सामान्य नागरिकाला केजरीवालांसोबत जेवण घेता येणार आहे. परंतु, या डिनर कार्यक्रमासाठी तब्बल दहा हजार रुपये मोजावे लागणार आहेत. पक्षाचा निधी जमा करण्यासाठी आपने अशा डिनर कार्यक्रमाची नवीन क्लुप्ती शोधून काढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal cancels vidarbha rallies citing ill health