केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे पेपर फुटल्याची बाब समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दहावीचा विज्ञान विषयाचा तर बारावीचा भूगोल, इंग्रजी आणि गणिताचा पेपर फुटला आहे. सोशल मीडियावर सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दहावी आणि बारावीचे पेपेर फुटल्याचे लक्षात येताच दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बोर्डालाYouTube पर याबाबत काही व्हिडीओ दिसून आले. ज्यामधून पेपर फुलटल्याचे बोर्डाला समजले. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या प्रश्नपत्रिका काही दिवसानंतर होणाऱ्या परिक्षाच्या आहेत.

CBSE ने दिल्‍ली पोलिसांना याप्रकरणी एक पत्र लिहून गुन्हेगाराविरोधात आयपीसी आणि आयटी काद्याअंतर्गत कारवाई करण्याची विनंती केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbse leaked question papers videos go viral fir registered