नवी दिल्लीत सरकारी शाळेमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या एका मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीच्या मध्यवर्ती भागामध्ये ही शाळा आहे. पोलिसांनी या प्रकरणी शाळेत काम करणाऱ्या इलेक्ट्रीशिअनला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी दिल्लीच्या गोल डाक खाना भागामध्ये ही शाळा आहे. उत्तर दिल्ली महापालिकेतर्फे ही शाळा चालवली जाते. या घटनेनंतर पालकांनी शाळेविरोधात जोरदार निदर्शने केली. महिलांना शाळेत प्रवेश करण्याआधी नोंदणी करणे बंधनकारक असताना एक पुरुष आतमध्ये कसा गेला ? असा सवाल पालकांनी विचारला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Classs second student rape in school