जापानचे माजी परराष्ट्रमंत्री फुमिओ किशिदा यांची पंतप्रधानपदी वर्णी लागणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. किशिदा यांची सत्ताधारी पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे निवडणूक जिंकल्यास किशिदा जापानचे पुढचे पंतप्रधान होतील, हे स्पष्ट आहे. त्यांनी लिबरल डेमोक्रेटिक पक्षाचे मुख्य नेते योशिहदे सुगा यांची जागा घेतली आहे. सुगा एका वर्षानंतर आपलं पद सोडणार आहेत. एक वर्षापूर्वी सुगा यांची पंतप्रधानपदी वर्णी लागली होती. तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची वर्णी लागली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लिबरल डेमोक्रेटिक पक्षाला किशिदा यांच्या रुपाने नवं नेतृत्व मिळालं आहे. किशिदा यांना पंतप्रधानपदासाठी मुख्य दावेदार मानलं जात होतं. ६४ वर्षीय किशिदा यांनी पक्षासाठी योजना प्रमुख ही जबाबदारी पार पाडली आहे. यापूर्वी २०२० मध्ये पक्ष नेतृत्वाच्या शर्यतीत योशीहिदे सुगा यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. मात्र आता त्यांना यश मिळालं आहे. किशिदा यांनी वॅक्सिनेशन मंत्री तारो कोनो यांना मात दिली आहे. या निवडणुकीत दोन महिला उमेदवारीही होत्या. साने ताकिची आणि सीइको नोडा अशी त्यांची नावं असून पहिल्या फेरीतच दोघं बाद झाले. पक्ष नेतृत्वाची निवडणूक जिंकल्यानंतर आता पुढील महिन्यात ते देशाचे पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारतील.

कोण आहेत फुमिओ किशिदा?

किशिदा यांनी क्रेडिट बँक ऑफ जापानमध्ये काम केलं आहे. त्यानंतर प्रतिनिधी सभेच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली. वर्ष १९९३ मध्ये त्यांची निवडणूक प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती. त्यानंतर हिरोशिमामधून खासदार म्हणून निवडून आले. २००७ ते २००८ आबे यांच्या मंत्रिमंडळात होते. त्यानंतर फाकुदा यांच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली. २००८ मध्ये फाकुदा यांनी त्यांना खाद्य सुरक्षा राज्यमंत्रिपद दिलं होतं. दुसरीकडे, ६३ वर्षीय फुमिओ यांनी ट्वीटरवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे चांगलाच वाद झाला होता. एप्रिल महिन्यात त्यांनी आपल्या पत्नीचा फोटो शेअर केला होता. त्यात एप्रॉन घालून पत्नी किशिदा यांना जेवण वाढत होती. या फोटोमुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. पत्नीला नोकरासारखी वागणूक दिल्याची टीका नेटकऱ्यांनी केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fumio kishida to become japan next pm after party vote rmt