केंद्र सरकारने गुगल आणि अॅपलला तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेले ‘टीक-टॉक’ अॅप डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत. ‘टीक-टॉक’ अॅपवर बंदी घालण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर केंद्र सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले. इकोनॉमिक्स टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणी सुनावणीसाठी २२ एप्रिलची तारीख निश्चित केली. या आदेशामुळे प्ले स्टोअरमधून टीक-टॉक अॅप्लिकेशन डाऊनलोड करता येणार नाही. पण ज्या लोकांनी आधीच हे अॅप डाऊनलोड केले आहे. ते याचा वापर करु शकतात.

टीक-टॉक अॅपचा गैरवापर होत असल्याने त्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मागच्या तिमाहीत अॅप स्टोर आणि गुगल प्लेमधून सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या जगभरातील अॅपमध्ये टीक-टॉक तिसऱ्या स्थानावर होते. मार्च तिमाहीत जगभरातून टीक टॉकशी १८.८ कोटी नवे युजर्स जोडले गेले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government asks apple google to take down tiktok app