Modi Surname Case : राहुल गांधींच्या मोदी आडनावावरूनच्या दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरच्या सुनावणीस जज गीता गुप्ता यांनी सुनावणीला नकार दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी दुसऱ्या बेंचकडून सुनावणी केली जाणार आहे. सूरत सत्र न्यायालयाला दिलेलं अपील नाकारल्यानंतर राहुल गांधी यांनी आता गुजरात हायकोर्टात धाव घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सत्र न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाला गुजरात कोर्टात आव्हान दिलं आहे. राहुल गांधी यांच्या याचिकेवर गुरुवारी शक्यता आहे. या प्रकरणी जेव्हा राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं. त्यानंतर बराच गदारोळ झाला होता. २४ मार्च २०२३ ला राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. २७ मार्चपर्यंत सरकारी निवासस्थान रिकामं करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचा बंगलाही रिकामा केला आहे.

मोदी आडनावाचं प्रकरण काय आहे?

११ एप्रिल २०१९ ला बंगळुरुच्या रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी असा प्रश्न विचारला होता की सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का असतं?

१३ एप्रिलला २०१९ ला भाजपाचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात तक्रार दाखल केली.

६ मे रोजी सूरत कोर्टात हे प्रकरण गेलं.

१६ जुलै, १० डिसेंबर २०१९ या दोन तारखांना राहुल गांधी कोर्टात हजर झाले होते

२९ ऑक्टोबर २०२१ राहुल गांधी कोर्टात हजर झाले होते

२३ मार्च २०२३ ला या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवलं गेलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व गेलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujrat hc judge recuses judge justice gita gopi recuses from hearing rahul gandhi in defamation case scj