भारताची अंतराळ संशोधन संस्था म्हणजे Indian Space Research Organisation ( ISRO ) संस्था पुढील वर्षी म्हणजे २०२४ ला भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवणार आहे. स्बबळावर अवकाशवीरांना अंतराळात पाठवणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. यासाठी इस्रोने गगनयान ( Gaganyaan ) मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत अवकाश यानातून तीन अंतराळवीर अवकाशात पाठवले जाणार आहे. तेव्हा या मोहिमेची तयारी विविध टप्प्यांवर सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंतराळवीरांचे प्रशिक्षण जवळपास पूर्ण होत आले आहे, अवकाश यानाला अवकाशात घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेले रॉकेट- प्रक्षेपकाचा आराखडा तयार झाला आहे, या मोहिमेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची तयारी पुर्ण झाली असून आता विविध चाचण्या सुरु आहेत.

याचाच एक भाग म्हणून अंतराळवीर ज्या अवकाश यानातून अवकाशात संचार करत परत पृथ्वीवर येणार आहेत त्या यानाच्या विविध चाचण्या सुरु आहेत. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या पॅराशुटची यशस्वी चाचणी चंदीगढ इथे पूर्ण केल्याचं इस्रोने नुकतंच जाहिर केलं आहे. अर्थात ही चाचणी जमिनीवर एका रेल्वे ट्रॅकवर घेण्यात आली. यामध्ये दोन्ही पॅराशुट हे विशिष्ट वेग असतांना व्यवस्थित उघडले जात आहेत की नाही हे तपासले गेले.

अवकाश यानाला दोन पॅराशुट असणार आहेत. पहिलं पॅराशुट हे अवकाशातून जमिनीच्या दिशेने येणाऱ्या अवकाश यानाचा प्रचंड वेग कमी करण्यास मदत करणार आहे. तर दुसरं पॅराशुट जे अत्यंत मोठं असणार आहे ते अलगदपणे यानाला जमिनीवर उतरवणार आहे. या दोन्ही पॅराशुटची चाचणी ही करण्यात आली असून ती यशस्वी झाल्याचं इस्त्रोने स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro successfully conducted parachute test of spacecraft that used in gaganyaan mission asj