एक्सप्रेस वृत्त, नवी दिल्ली : काही माजी न्यायाधीश भारतविरोधी टोळीमध्ये सहभागी आहेत, असे विधान केल्यामुळे विधिमंत्री किरेन रिजिजू यांच्यावर टीका होत आहे. कायदामंत्री गुन्हेगारांच्या भाषेत बोलत आहेत अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली तर एखादा मंत्री असे विधान करून नामानिराळा राहू शकत नाही, या विधानाची पुष्टी करणारे पुरावे द्या, धमकी देऊ नका अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सिरकर यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठ वकील आणि माजी कायदा व न्यायमंत्री कपिल सिब्बल यांनीही रिजिजू यांच्यावर टीका केली. काही लोकांना आपण काय बोलत आहोत तेच समजत नाही असे ते म्हणाले. तर किरेन रिजिजू हे कायद्याचे मंत्री आहेत की अनागोंदीचे असा प्रश्न माकप नेते थॉमस आयझ्ॉक यांना विचारला.  मुन्सिफ होण्याची पात्रता नाही अशी व्यक्ती न्यायाधीशांना धमकावत आहे, अशी टीका ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Law minister kiren rijiju criticism of congress jairam ramesh ysh
First published on: 20-03-2023 at 00:02 IST