Manoharlal Dhakad Reaction on Delhi-Mumbai Expressway Compromising Viral Video : गेल्या आठवडाभरापासून एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भर रस्त्यात कार थांबवून एका महिलेबरोबर शारीरिक संबंध बनवत असल्याचं दिसत आहे. मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यातून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील ही घटना महामार्ग प्राधिकरणाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव मनोहरलाल धाकड असं असून ते भाजपाचे माजी नेते आहेत.

मनोहरलाल धाकड यांना रविवारी (२५ मे) पोलिसांनी अटक केली होती. मात्र, सोमवारी त्यांना न्यायालयने जामीन दिला. तसेच पोलीस या व्हिडीओत धाकड यांच्याबरोबर दिसणाऱ्या महिलेचा शोध घेत आहेत.

त्या व्हिडीओवर पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, मनोहरलाल धाकड यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आजतक या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दावा केला आहे की “तो व्हिडीओ बनावट आहे. या बनावट व्हिडीओच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सगळं माझ्या बदनामीचं षडयंत्र आहे. तो व्हिडीओ व्हायरल करणारे व त्या व्हिडीओचा माझ्याशी संबंध जोडणाऱ्यांविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे”.

धाकड यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर

पोलिसांनी तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर धाकड यांना अटक केली होती. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६ (सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवणे), कलम २८६ (बेजबाबदारपणे वागून स्वतःस व इतरांना धोका निर्माण करणे) आणि इतर काही कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर न्यायालयात धाकड यांच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्तींनी त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार : धाकड

व्हायरल व्हिडीओबाबत मनोहरलाल धाकड म्हणाले, “तो व्हिडीओ बनावट आहे. त्या व्हिडीओत दिसणारा माणूस मी नव्हे. मी त्या कारमध्ये नव्हतो. ती कार माझी नाही. मी ती कार केव्हाच विकली आहे. न्यायालय आता त्या व्हिडीओची सत्यता तपासेल आणि त्यातून सत्य सर्वांसमोर येईल. मी न्यायालयात ठामपणे माझी बाजू मांडणार आहे. तसेच तो व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फरार का झाले?

दरम्यान, धाकड यांना विचारण्यात आलं की तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तुम्ही फरार असल्याची चर्चा होती, आठ दिवस भूमिगत का झाला होता? त्यावर धाकड म्हणाले, “पोलीस माझ्या घरी आले आणि माझी कार घेऊन गेले होते. मी घाबरलो होतो. माझं प्रतिमाहनन केलं जात होतं. त्यामुळे मी शांत राहीलो”.