राष्ट्रपतींना निमंत्रण न देता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या उपस्थितीत नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत आहे. त्याचा निषेध करत या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे या सोहळ्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे ( धर्मनिरपेक्षक ) सर्वेसर्वा एच. डी. देवगौडा यांनी यावर भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“नवीन संसद भवनच्या सोहळ्याचा उपस्थित राहणार आहे. तसेच, ही इमारत भाजपा अथवा आरएसएसचे कार्यालय नाही,” अशा शब्दांत एच. डी. देवगौडा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधी पक्षाचा बहिष्कार, पंतप्रधान मोदी लक्ष्य करत म्हणाले…

“नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला मी उपस्थित राहणार आहे. ही भव्य इमारत देशातील जनतेच्या करातून बांधण्यात आली आहे. ती देशाची आहे. ही इमारत भाजपा किंवा आरएसएसचे कार्यालय नाही,” असं एच. डी देवगौडा यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री अमित शाहांचं काँग्रेसवर टीकास्र

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. यावरून गृहमंत्री अमित शाहांनी टीका केली आहे. “पंतप्रधान मोदींच्या हस्ते २८ मे रोजी नव्या संसदेच्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे. पण, राष्ट्रपतींनी उद्घाटन करावे, असं सांगत काँग्रेस बहिष्कार टाकून राजकारण करत आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षातील राज्यांमध्ये विधानसभा इमारतींची पायाभरणी राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री किंवा सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी केली होती,” असं अमित शाह म्हणाले.

हेही वाचा :  लोकसभेत हिरवे आणि राज्यसभेत लाल कारपेट, असे का असते?

राहुल गांधींनी मोदी सरकारवर साधला निशाणा

राष्ट्रपतींना निमंत्रण न देण्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. “संसदेची उभारणी अहंकाराच्या विटांनी नव्हे, तर घटनात्मक मुल्यांनी होते. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण राष्ट्रपतींना न देण्याची भूमिका हा त्यांचा अवमान आहे,” असं राहुल गांधींनी म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New parliament building countrys property will attend inauguration say jds supremo deve gowda ssa