फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया अॅप्स आज सकाळी डाऊन झाले होते. या अॅपमध्ये प्रवेश करताना आणि अॅपचे इतर फिचर्स वापरताना वापरकर्त्यांना अडचणी येत होत्या. कालांतराने हे सोशल मीडिया अॅप्स पूर्ववत कार्यरत झाले आहेत. परंतु, हे आऊटेज जागतिक होते आणि याचा फटका दोन्ही अॅप्सना बसला असून वापरकर्त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपला राग व्यक्त केला आहे.

आज सकाळपासून फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाले होते. या अॅपमध्ये कोणतेच फिचर्स वापरता येत नव्हते. त्यामुळे एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अनेकांनी संताप व्यक्त केला. एक्सवर काही वेळ #FacebookDown आणि #InstagramDown ट्रेडिंगला होते.

हेही वाचा >> जरा सांभाळून! दरवाज्याचे हँडल पकडताच सापाने केला हल्ला, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

दोन्ही अॅप्स पूर्ववत पण कारण अद्याप अस्पष्ट

दुसरीकडे, इंस्टाग्राम वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यांमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न करताना समस्या येत होत्या. ६६ टक्के वापरकर्त्यांना ॲप-संबंधित समस्या होत्या आणि २६ टक्के वापरकर्त्यांना Instagram च्या वेब आवृत्तीमध्ये प्रवेश करता आला नाही.फेसबुक आणि इंस्टाग्रामने अद्यापही याबाबत अधिकृत माहि दिलेली नाही. त्यामुळे हे दोन्ही अॅप डाऊन झाल्याचे कोणतेही कारण समोर आलेले नाही. दरम्यान, हे दोन्ही अॅप्स पहिल्यांदाच डाऊन झालेले नाहीत. याआधीही अनेकवेळा हे दोन्ही अॅप्स डाऊन झालेले आहेत. परंतु, तांत्रिक अडचणी दूर करून पुन्हा पूर्ववतही झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया खाती हॅक होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.त्यामुळे अशा प्रकारे सोशल मीडिया डाऊन झाल्यास वापरकर्ते घाबरतात. त्यांचे अकाऊंट हॅक झाल्याचा संशय येतो. कारण अॅप्स डाऊन झाल्यानंतर लॉग इन करायला अडचणी येतात.

हेही वाचा >> ‘काहीचं बदललं नाही…’ मुंबई लोकलचा ‘तो’ जुना फोटो पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली चिंता

दरम्यान, इन्स्टाग्राम आणि फेसबुक डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत. हे मीम्सही सर्वाधिक चर्चेले जात आहेत. इन्स्टाग्राम आणि फेसबुक डाऊन झाल्यानंतर एक्सवर अनेकजण सक्रिय झाले होते. त्यामुळे एक्सवरच अनेकांनी मीम्स व्हायरल केले.