Viral Video : साप हा शब्द जरी कानावर पडला तरी अंगावर काटा येतो. मानवी वस्तीमध्ये अनेकदा साप आढळतात. मानवी वस्तीतील सापाचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी घरात तर कधी अंगणात साप दिसून येतात. साप दिसल्यानंतर कोणाच्याही अंगावर काटा येतो. काही लोक साप पकडण्यासाठी सर्पमित्राला बोलावतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका व्यक्तीने दरवाज्याच्या हँडल ओढताच त्याच्यावर सापाने हल्ला केला आहे. व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Snake wraps itself around door handle video viral)

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका भयानक सापाने एका व्यक्तीवर हल्ला केला आहे. हा साप दरवाज्याच्या हँडलवर गुंडाळलेला होता. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती घराच्या बाहेर पडते आणि दरवाजा बंद करताना हॅन्डलवर असलेला साप अचानक त्याच्या हातावर हल्ला करतो हल्ला करताच ही व्यक्ती त्याचा हात मागे घेत पळत सुटते. नशीब चांगले की साप त्या व्यक्तीला चावला नाही पण ही घटना कोणत्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. ही घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली. या सीसीटिव्ही फुटेजचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.
तुम्ही सुद्धा दरवाज्याची कडी किंवा हँडलवर हात ठेवताना काळजी घ्या. अनेकदा आपल्या घराच्या परिसरात साप आढळून येतात. त्यामुळे वेळोवेळी सतर्क राहणे गरजेचे आहे. ही घटना अमेरिकेतील स्पार्टनबर्ग येथील आहे.

couple caught kissing and indulging in obscene act in crowded crut bus in odisha video goes viral
निर्लज्जपणाचा कळस! बसच्या मागच्या सीटवर कपलचे अश्लील चाळे; प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की….; VIDEO झाला व्हायरल
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
wife with two men in UP hotel
पत्नीला दोन पुरुषांसह हॉटेल रुमच्या बाथरुममध्ये पकडलं; पतीनं तिघांनाही झोडलं, Video व्हायरल
Pavitra Jayaram Dies In a Car Accident
प्रसिद्ध अभिनेत्री अपघातात जागीच ठार, दुभाजकावर आदळलेल्या कारला बसने दिली धडक, तिघे जखमी
Jalgaon Accident major accident car hit man
VIDEO: जळगांवच्या रस्त्यावर रात्री १२चा थरार; डॉक्टरांच्या आयुष्याचा असा झाला शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
Uttarakhand accident video
उत्तराखंडच्या घाटातील २५ सेकंदाचा ‘हा’ VIDEO व्हायरल; यातील ५ सेकंदाचं दृश्य पाहून घाम फुटेल, नक्की चूक कुणाची?
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल

हेही वाचा : VIDEO : काय ती अदा, काय ते भुरभुरे केस! मुंबई लोकलमध्ये ‘गुलाबी साडी’ गाण्यावर तरुणाचा जबरदस्त डान्स, पाहून प्रवासी थक्क

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : चित्रकाराची किमया! एअर होस्टेसचं बनवलं खास डूडल; कलाकारी पाहून ‘तिने’ काय दिलं रिटर्न गिफ्ट? VIDEO तून बघा

ViralHog या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “साप दरवाज्याजवळ वाट बघतोय” १७ हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ बघितला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “साप म्हणत असावा मी दरवाजा बंद करतोय” तर एका युजरने लिहिलेय, “हा कोणत्या प्रकारचा साप आहे”