रशियन मॉडेल ग्रेटा वेडलर हिच्या मृत्यूने खळबळ माजली आहे. ग्रेटाचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळला आहे. २३ वर्षीय ग्रेटा गेल्या साधारण वर्षभरापासून बेपत्ता होती, मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय दिसत होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना तिने ‘मनोरुग्ण’ असं संबोधलं होतं, तेव्हापासून ती चर्चेत आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ग्रेटा वेडलरची हत्या तिचा एक्स बॉयफ्रेंड दिमित्री कोरोविनने केली होती. कोरोविननं ग्रेटाचा गळा दाबून खून केला आणि नंतर मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून कारच्या ट्रंकमध्ये टाकला. आता कोरोविनने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि असे म्हटलं आहे की, त्याने ग्रेटाला ३०० मैल दूर रशियाच्या लिपेटस्क येथे नेलं होतं. तिथं त्याने ग्रेटाचा मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवला आणि कारच्या ट्रंकमध्ये असाच सोडून दिला होता.


पैशाच्या वादातून दिमित्री कोरोविननं ग्रेटाची हत्या केल्याचं सांगण्यात आलं. या हत्येचा आणि ग्रेटाच्या राजकीय वक्तव्याचा काहीही संबंध नसल्याचं सांगितलं जात आहे. कोरोविनने सांगितले की, तो तीन रात्री हॉटेलच्या खोलीत ग्रेटाच्या मृतदेहासोबत झोपला होता.


ग्रेटाच्या मृत्यूनंतर कोरोविन तिचं सोशल मीडिया पेज अपडेट करत होता, जेणेकरुन कोणालाही तिच्या मृत्यूचा किंवा गायब झाल्याचा संशय येऊ नये. सध्या ग्रेटाचा एक्स बॉयफ्रेंड कोरोविन यानं हत्येची कबुली दिली आहे. त्याच्या सांगण्यावरून ग्रेटाचा मृतदेहही सापडला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russian model who called putin mental patient found dead in suitcase vsk