समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. गंगा नदी स्वच्छ नाही हे योगींना माहित आहे म्हणून त्यांनी नदीत स्नान केलं नाही, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे. प्रश्न हा आहे की गंगामाता स्वच्छ होणार का? त्यासाठी मिळालेला पैसा वाहून गेला, मात्र गंगा अजूनही स्वच्छ झालेली नाही, असंही यादव म्हणाले,
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय वाराणसी दौऱ्यावर होते. त्यांनी वाराणसीच्या ललिता घाट इथं गंगा नदीची पूजा करत स्नान केलं. ते काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पासाठी आले होते.
याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत असे म्हटले की लोक त्यांचे शेवटचे दिवस वाराणसीमध्ये घालवतात. पंतप्रधान मोदींच्या वाराणसी भेटीबद्दल विचारले असता, अखिलेश यादव यांनी इटावा येथे पत्रकारांना सांगितले की, “ते [बनारस] राहण्याचे ठिकाण आहे. लोक त्यांचे शेवटचे दिवस बनारसमध्ये घालवतात.”
पीएम मोदींनीही सपावर हल्ला चढवला होता की लाल (सपाच्या टोपीचा रंग) उत्तरप्रदेशसाठी धोक्याचा इशारा आहे.