Toll Booth Rules, Can Your Vehicle get Concession: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) अलिकडच्या वर्षांत टोल प्लाझावर सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत, तरीही टोलनाक्यावर अनेकदा भल्यामोठ्या रांगा लागलेल्या दिसतात याचे मुख्य कारण म्हणजे अनेक वाहनचालकांना अजूनही टोल कोणी भरायचा आहे व कोणी नाही याविषयी संभ्रम आहे. NHAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाहनांच्या फक्त पाच श्रेणी आहेत ज्यांना टोल भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. आज आपण या लेखात या पाच प्रकारच्या वाहनांविषयी जाणून घेणार आहोत, तसेच एक बोनस टीप सुद्धा पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजा कधी दुर्दैवाने इतर निष्काळजी वाहनचालकांमुळे त्रास झाला तर तुम्हाला विशिष्ट टोल भरताना सूट मिळू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वात प्रथम टोल भरण्यात सूट असलेली वाहने कोणती हे पाहा

  • आपत्कालीन सेवा
  • संरक्षण सेवा
  • VIP वाहने
  • सार्वजनिक वाहतूक
  • दुचाकी

NHAI मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आपत्कालीन वाहने जसे की रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलिस वाहनांना टोल भरण्यापासून सूट आहे. लष्कर, नौदल किंवा हवाई दलाच्या सेवेतील संरक्षण वाहनांनाही सूट देण्यात आली आहे आणि राष्ट्रपती, पंतप्रधान, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राज्य दौऱ्यावर असलेल्या परदेशी मान्यवरांना घेऊन जाणाऱ्या व्हीआयपी वाहनांनाही सूट देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, सार्वजनिक वाहतूकीची वाहने आणि दुचाकी वाहने देखील काही राष्ट्रीय महामार्गावरील (अपवाद वगळता) टोल भरण्यापासून मुक्त आहेत.

बोनस टीप

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, इतर वाहनांना अन्य कोणत्याही परिस्थितीत टोल भरण्यापासून सूट दिली जात नसली तरी, नव्या NHAI मार्गदर्शक तत्त्वांनुसार काही वाहनांना अपवादात्मक स्थितीत सूट मिळू शकते. जसे की, वाहनांना १०० मीटरपेक्षा जास्त रांगेत उभे राहण्याची परवानगी नाही. तसेच टोल प्लाझांना प्रति वाहन १० सेकंदांपेक्षा जास्त वेळ एका वाहनासाठी देता येत नाही. जर या अटींची पूर्तता झाली नाही आणि रांग १०० मीटरपेक्षा जास्त असेल, तर मार्गदर्शक तत्त्वांनुसार टोल कर्मचार्‍यांनी रांग १०० मीटरच्या आत येईपर्यंत वाहनांना विनामूल्य जाण्याची परवानगी द्यावी लागू शकते. ही १०० मीटर रांगेची सूट कोणाला लागू होते हे तपासण्यासाठी प्रत्येक टोल लेनमध्ये एक पिवळी रेषा आखलेली असते त्याकडे लक्ष ठेवावे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car bike can claim free pass at toll booth with yellow line rule check which vehicles types can go without paying tax full list svs