Honey : मध हा बहुगुणी आहे असं म्हटलं जातं. बाजारात विविध कंपन्यांचे मध ( Honey ) मिळतात. डाबर, फोंडाघाट, बैद्यनाथ, पतंजली या आणि अशा अनेक कंपन्या आहेत ज्या मध तयार करतात. तसंच अनेक जण थेट खुला मधही घेणं पसंत करतात. मात्र खुल्या मधातही भेसळ होते. मग अस्सल मध आणि बनावट म्हणजेच भेसळ असलेला मध कसा ओळखायचा? याची एक साधी पद्धत आहे. या बद्दलचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे.

मध ( Honey ) बनावट आहे की अस्सल हे ओळखण्याचे अनेक प्रकार आहेत. मात्र या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे पाच सेकंदात मध अस्सल आहे बनावट हे ओळखू शकता. या व्हिडीओत दाखवलं आहे की तो माणूस मधाचा एक थेंब त्याच्या टी शर्टला लावतो. त्यानंतर तातडीने तो मधाचा थेंब हाताने हटवतो. या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे टी शर्टवर मधाचा डाग पडत नाही. मधाबाबत बोलणारा माणूसही हेच सांगतो की जर मध अस्सल आहे तर त्याचा कुठलाही डाग तुमच्या कपड्यावर राहणार नाही. मात्र बनावट किंवा भेसळयुक्त मध कपड्यांवर चिकटून राहतो. सध्याच्या घडीला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. foody_rahul या युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हे पण वाचा- Healthy Living: रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी काय आहे उपयोगी? जाणून घ्या मध, गूळ आणि साखरेचे परिणाम…

एका मध विक्रेत्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या विक्रेत्याने तो विकत असलेला मध ( Honey ) शुद्ध आहे हे दाखवण्यासाठी विक्रेत्याने चाचणी केली. त्याने एक रुपया घेतला. १० रुपयाची नोट आणि त्यावर थोडे मध टाकून सांगितले की मध शुद्ध असेल तर कागद कधीच जळणार नाही. यानंतर त्याने पुढे ती नोट पेटवली. मग तो मध टाकलेल्या भागाच्या खाली आग ठेवतो. पण तरीही १० रुपयांची नोट जळली नाही. या विक्रेत्याने सांगितले की तो जंगलातून हा शुद्ध मध आणतो आणि त्याचे एक लिटर १२०० रुपयांना विकतो. या व्यक्तीने अशाप्रकारे मध शुद्ध असल्याचे दाखवून दिले. पण असे असेल तरी देखील अनेक वापरकर्त्यांनी कमेंटमध्ये मध शुद्ध नसल्याचा दावा केला. अनेकांनी दावा केला की हे गूळ आणि साखरेचे द्रव मिश्रण आहे ज्यामुळे ते शुद्ध मधासारखे ( Honey ) दिसते आणि ते घट्ट होते.

भेसळ युक्त मध आणि शुद्ध मध ओळखण्याचे प्रकार

पाण्याने मधाची शुद्धता तपासणे हा लोकप्रिय मार्ग आहे. यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये मधाची बारीक धार सोडा, जर पाण्यात मध मिसाळले तर याचा अर्थ ते भेसळयुक्त आहे आणि जर ग्लासच्या तळाशी जमा झाले, तर ते शुद्ध मध आहे असे समजावं.

वातावरणातील बदलानुसार दिसणारा फरक

हिवाळ्यात मध अधिक घट्ट होते, तर उन्हाळ्यात ते वितळते. वातावरणातील बदलानुसार हा फरक दिसत नसेल तर याचा अर्थ मध भेसळयुक्त आहे. मध ओळखण्याचे हे दोन प्रकार लोकप्रिय आहेत. ज्यावरुन भेसळयुक्त मध आणि अस्सल मध ओळखता येतो.