नवीन वर्ष सुरू व्हायला मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. भारतातही नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अशा पार्ट्यांमध्ये हमखास मद्यप्रेमींसाठी दारूची सोय करण्यात येतेच. भारतात दारूचे अनेक शौकीन आहेत. एका अहवालानुसार भारतात जवळपास १६ कोटी लोक दारू पितात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ख्रिसमसच्या दिवशी मिस्टलेटो झाडाखाली लोक Kiss का करतात? त्यामागे आहे रंजक गोष्ट; जाणून घ्या विविध परंपरा

भारतात प्रति व्यक्ती मागे अल्कोहोलचं प्रमाण ५.६१ लीटर आहे. त्यामुळेच भारतात दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होते. भारताच्या लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण खूप जास्त आहे. दारूच्या विक्रीतून सरकारला चांगला पैसा मिळतो. दारूच्या बाटलीवर भरमसाठ कर लावला जातो, त्यामुळे तिच्या मूळ किमतीत वाढ होते. साधारण दारूच्या बाटलीची मूळ किंमत किती असते व तिच्यावर किती कर लावला जातो, जाणून घेऊयात.

दारूच्या एका बाटलीची किंमत किती असते?

भारतात एकीकडे दारू पिणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, तर दुसरीकडे दारूच्या बाटलीच्या किमतीत वाढ झालेली बघायला मिळाली आहे. दारूची किंमत कितीही वाढली तरी ती पिणाऱ्यांच्या संख्येत जराही घट होताना दिसत नाही. क्वचितच दारूच्या वाढत्या किमतीला विरोध होताना दिसतो. अन्यथा दारूचे शौकीन असणारे लोक आहे त्या किमतीत बाटली विकत घेतात. आता वेगवगेळ्या राज्यांमध्ये दारूच्या बाटलीचे दर निरनिराळे असतात. सरकारला दरवर्षी दारूपासून भरपूर कमाई होते. एका दारूच्या बाटलीची किंमत हजार रुपये असेल तर त्यावर सरकार ३० ते ३५ टक्के कर वसूल करते. म्हणजेच दुकानातून खरेदी होणाऱ्या १००० रुपयांच्या दारूच्या बाटलीमधील सुमारे ३५० रुपये थेट सरकारच्या तिजोरीत जातात.

हेही वाचा- विमान उतरवताना पायलट बाहेरचं तापमान का सांगतो? प्रवाशांसाठी हवामानाबाबतची माहिती का गरजेची असते? 

दारूच्या बाटलीवर आकारले जातात अनेक कर

दारूच्या बाटलीवर अनेक कर आकारले जातात. ज्यामध्ये विशेष वाहतूक शुल्क लेबल आणि नोंदणी शुल्क समाविष्ट आहे. जर दारू भारतात बनवली असेल तर त्यावर कमी कर लागतात आणि जर विदेशी दारू असेल तर त्यावर जास्त कर लावले जातात. यामुळेच एका राज्यात ९०० रुपयांना मिळणारी दारूची बाटली दुसऱ्या राज्यात १४०० ते १५०० रुपयांना मिळते.

हेही वाचा- वाढदिवसाला केक का कापतात? मेणबत्त्या विझवण्याची प्रथा कशी सुरू झाली? रंजक इतिहास जाणून घ्या

ज्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या करांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये दारूच्या बाटल्यांची किंमत वेगवेगळी असते. दिल्लीत एक दारूची बाटली १०० रुपयांना मिळत असेल तर कर्नाटकात तीच बाटली ५०० रुपयांना मिळते. महाराष्ट्रात जी दारू ८०० रुपयांना मिळते, ती दारू गोव्यामध्ये ४०० रुपयांना मिळते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the actual price of one bottle alcohol which increases by due to tax know here dpj