अनेकदा समोरचा व्यक्ती जर जांभई देत असेल तर त्याला बघून आपल्याही जांभई येते. जांभई देणाऱ्या व्यक्तीकडे आपली नजर पडली रे पडली की आपणही जांभई देऊ लागतो. असे तुमच्यासोबतही अनेकदा घडले असेल. खरतर एखाद्याला जांभई देताना पाहणे आणि आपल्यालाही जांभई येणे हे माणसाच्या स्वभावाचा एक असतो. याबाबत अनेक संशोधने झाली आहेत. पण त्यामागचे वैज्ञानिक कारण माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हालाही समोरच्या व्यक्तीला बघून जर जांभई येत असेल तर त्याचे कारण जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा कोणाला जांभई देताना पाहून लोक विचारतात, का रे तुझी रात्री व्यवस्थित झोप पूर्ण झाली नाही का? पण जांभई आणि झोपेचे खरचं संबंध असतो का? असा प्रश्न पडतो. कारण कधी कधी आपण दुसऱ्या व्यक्तीला पाहूनही जांभई देऊ लागतो. अशाप्रकारे कितीही झोप पूर्ण झाली असली तर समोरच्या व्यक्तीला जांभई देताना पाहून जांभई येते. पण यामागेही एक वैज्ञानिक कारण आहे जे आपल्या मेंदूशी संबंधित आहे.

जांभई दिल्याने मेंदूला थंडावा मिळतो

अमेरिकेच्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, जांभई देण्याचा संबंध आपल्या मेंदूशी असतो. काम करताना जेव्हा आपला मेंदू गरम होतो, तेव्हा मेंदूला थोडे थंड करण्यासाठी जांभई येते. जांभईमुळे आपल्या शरीराचे तापमान स्थिर होते. अ‍ॅनिमल बिहेवियर जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, ज्या लोकांचा मेंदू जास्त काम करतो, ते लोक थोड्या जास्त वेळा जांभई देतात.

म्युनिक सायकियाट्रिक युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये २००४ साली या विषयावर एक अभ्यास करण्यात आला. ज्यात असे दिसून आले की, जांभई संसर्ग पसरण्याचे कारण बनू शकते. हा अभ्यास ३०० लोकांवर करण्यात आला, ज्यामध्ये १५० लोक इतर लोकांना पाहून जांभई देऊ लागले.

न्यूरॉन सिस्टम होते अॅटिव्ह

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती जांभई देते तेव्हा त्या व्यक्तीला पाहून आपली मिरर न्यूरॉन सिस्टम सक्रिय अॅटिव्ह होते. ही सिस्टम आपल्याला जांभई देण्यास प्रवृत्त करते. यामुळेच ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला जांभई देण्यास किंवा झोपण्यास मनाई केली जाते. कारण असे केल्याने चालकालाही जांभई येते आणि झोप येते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do we yawn itself when seeing others yawning know the reason behind this sjr