फ्रान्सच्या कान शहरात ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांचा ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ हा चित्रपट प्रतिष्ठित पाल्मे डी’ओर श्रेणीमध्ये प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान चित्रपटातील इतर कलाकारांबरोबर अभिनेत्री कनी कुसरुतीनेही उपस्थिती दर्शवली. त्यावेळी तिच्या हातातील कलिंगडासारख्या दिसणार्‍या एका बॅगने सर्वांचे लक्ष वेधले. पण, असे या बॅगमध्ये वेगळे काय होते? हा चर्चेचा विषय का ठरत आहे? याबद्दल जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाझावरील इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांदरम्यान पॅलेस्टिनींना पाठिंबा देण्यासाठी कलिंगड शक्तिशाली प्रतीक मानले जाते. अभिनेत्री कनी कुसरुतीने गुरुवारी तिच्या अत्यंत प्रशंसित ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’च्या स्क्रिनिंगदरम्यान कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये कलिंगडाच्या बॅगबरोबर फोटोशूट केले. पॅलेस्टिनींना पाठिंबा म्हणून तिच्या या कृतीकडे पाहिले गेले. उल्लेखनीय बाब म्हणजे, पॅलेस्टाईनमध्ये वेस्ट बँक ते गाझापर्यंत कलिंगडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते आणि पॅलेस्टिनी पाककृतींमध्ये कलिंगडांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

हेही वाचा : Prajwal Revanna Sex Scandal: अपहरण-लैंगिक छळ प्रकरणात एचडी रेवण्णा यांना जामीन कसा मिळाला?

निषेधाचे प्रतीक

इस्रायलकडून गाझामध्ये रक्तपात घडवून आणणाऱ्या हमासच्या हल्ल्यापूर्वीच पॅलेस्टाईनमध्ये खळबळ उडाली होती. एका दहशतवाद्याने तुरुंगातून सुटल्यानंतर पॅलेस्टाईन ध्वज फडकावला; ज्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन गवीर यांनी पोलिसांना पॅलेस्टाईनचा ध्वज सार्वजनिकरित्या फडकावण्यावर बंदी आणण्यास सांगितले होते, असे वृत्त ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने दिले.

इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी ध्वज फडकावण्यास कायदेशीर बंदी आणली गेली नाही, परंतु ध्वज फडकावल्यास अशांतता निर्माण होऊ शकते, असा दावा करून पोलीस बऱ्याचदा कारवाई करायचे. ध्वज फडकावल्याविरोधात अटक केली जात असताना जूनमध्ये, ‘झाझिम’ नावाच्या एका संस्थेने तेल अवीवमध्ये चालणाऱ्या टॅक्सींवर कापलेल्या कलिंगडाच्या प्रतिमा चिकटवण्यास सुरुवात केली. त्यावर “हा पॅलेस्टिनी ध्वज नाही,” असा मजकूर लिहून संदेशही देण्यात आला.

पहिल्यांदा कलिंगड पॅलेस्टिनी एकतेचे प्रतीक म्हणून कधी वापरले गेले?

हे अद्यापही स्पष्ट नाही की, कलिंगड निषेधामध्ये पॅलेस्टिनी एकतेचे प्रतीक म्हणून कधी वापरले गेले. अनेक माध्यमांनुसार, १९८७ ते १९९३ दरम्यान झालेल्या पहिल्या इंतिफादावेळी प्रतिकाराचे प्रमुख प्रतीक म्हणून त्याचा वापर कलिंगडाचा वापर करण्यात आला होता. पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये अभूतपूर्व संघर्ष झाला होता, ज्याला पॅलेस्टाईनने ‘इंतिफादा’ असे नाव दिले. १९६७ मध्ये इस्रायल आणि आखाती देशांमध्ये संघर्ष उफाळला होता. त्यावेळी इस्रायालने वेस्ट बँक आणि गाझा भागात पॅलेस्टाईनचा ध्वज घेऊन प्रदर्शन करण्यास बंदी आणली होती. त्यामुळे या काळात कापलेल्या कलिंगडाचा वापर निषेधासाठी केला गेला असावा, अशी शक्यता आहे.

दोन पॅलेस्टिनी चालवत असलेल्या ‘Decolonize Palestine, Ramallah’ या वेबसाइटमध्ये असा दावा केला आहे की, “पहिल्या इंतिफादाच्या साहित्यात (इंग्रजी आणि अरबीमध्ये) याचा उल्लेख आढळत नाही. राजकीय विधान म्हणून किंवा पॅलेस्टिनी ध्वजाचा पर्याय म्हणून कलिंगडांच्या कापांचा वापर केला गेलेला नाही.”

१९८० मध्ये रामल्लाहमध्ये इस्त्रायलच्या लष्कराने एक गॅलरी बंद केली होती. ही गॅलरी चालवणार्‍यांवर आरोप होता की, ते पॅलेस्टाईन ध्वजाच्या रंगात असलेल्या राजकीय गोष्टी दाखवत आहेत. या गॅलरीचे संचालन करणाऱ्या स्लिमॅन मंसूर यांना सांगितले होते की, इस्त्रायली पोलीस त्यांना म्हणाले की, त्यांच्या परवानगीशिवाय या गॅलरीचे प्रदर्शन भरवणे बेकायदा आहे. पॅलेस्टाईन ध्वजाच्या रंगात कोणतीही वस्तू रंगवू नये. इस्त्रायली अधिकाऱ्यांनी त्यावेळी कलिंगडाकडे इशारा करत म्हटले होते की, याचे प्रदर्शनही नियमांचे उल्लंघन आहे. कारण जेव्हा कलिंगड कापले जाते, तेव्हा त्याचे रंग पॅलेस्टाईन ध्वजासारखे दिसतात.

हेही वाचा : रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर आहेत पण नर्सेस नाहीत, काय आहेत कारणं?

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांनी ओस्लो कराराचा एक भाग म्हणून एकमेकांना मान्यता दिल्यानंतर लिहिण्यात आलेल्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या लेखात म्हटले आहे, “गाझा पट्टीमध्ये तरुणांना एकेकाळी कापलेले कलिंगड वाहून नेल्याबद्दल अटक करण्यात आली होती. कारण – कलिंगडामध्ये पॅलेस्टाईन ध्वजाचा लाल, काळा आणि हिरवा रंग असतो, जो पॅलेस्टाईन ध्वजासारखा दिसतो.” परंतु, सरकारी प्रेस ऑफिस जेरुसलेमच्या संचालकाने ‘न्यूयॉर्क टाइम्स’ वृत्तपत्राला पत्र लिहिले, “या प्रकरणाची योग्य अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यावर, मी हे सांगू शकतो की अशा अटकेचे इस्रायली धोरण कधीच नव्हते. जर असे काही घडले असेल तर अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीवर कारवाई केली गेली नाही. ” हा तपशील नंतर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने मागे घेतल्याचे पाहायला मिळते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How watermelon became a palestinian symbol rac
First published on: 25-05-2024 at 15:40 IST