कोल्हापूर :  मुंबई मध्ये स्वरसम्राजी, भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर अंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची उभारणी करण्याकरिता सुमारे ४०० कोटी रुपये खर्चाची निविदा आचारसंहिता संपल्या नंतर प्रकाशित होईल. त्यानंतर लगेचच शास्त्रीय संगीताचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे केंद्र कलिना कॅम्पस परिसरामध्ये सुरू होईल, अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे दिली.

येथील गायन सभा देवल क्लबच्या वतीने नूतनीकरण करण्यात आल्या गोविंदराव टेंबे रंगमंचाचे उद्घाटन आज मंत्री पाटील यांच्या हस्ते दीपप्रजनाने करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

हेही वाचा >>>वयाच्या नव्वदीत डॉ. चंद्रकुमार नलगे यांनी साकारले शंभरावे पुस्तक; प्रकाशन सोहळा रविवारी कोल्हापुरात

कार्यक्रमास गायिका अश्विनी भिडे देशपांडे, गायन देवल क्लबचे अध्यक्ष व्हि. बी. पाटील, उपाध्यक्ष चारुदत्त जोशी, सचिन पुरोहित,  राजेंद्र पित्रे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रभाकर वर्तक यांनी क्लबचा इतिहास सादर केला. संस्थे पु. ल देशपांडे यांनी सादर केलेले भाषण उपस्थितना ऐकवण्यात आले. त्यांनी व्यक्त केलेले स्वप्न आज साकार होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.यावेळी मंत्री पाटील यांच्या हस्ते पोतनीस, जाधव, देशपांडे, टेंबे, परिवार, अश्विनी भिडे देशपांडे, मोहन गुणे, नेवाळकर आदींचा सत्कार करण्यात आला.

चंद्रकांत पाटी म्हणाले, कोल्हापूरला लता मंगेशकर, संगीतकार फडक्यांपासून समृध्द परंपरा आहे.देवल क्लब मध्ये काम आता ४१० प्रेक्षा क्षमतेचे हे वातानुकूलित, उत्तम ध्वनी यंत्रणा असलेले कार्यालय सुरू झाले आहे. येथे दरमहा एक याप्रमाणे वर्षभराच्या बारा कार्यक्रमाचे जबाबदारी स्वतः घेत असल्याचे सांगून त्यांनी संयोजकांना कडे धनादेश दिला.